Pandharkawada :- तालुक्यातील पिंपळखुटी येथील सम्राट धाब्याच्या मागे सुरु असलेल्या जुगारावर पोलीसांनी धाड मारुन ४ लाख ८९ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन ११ जुगार्याना ताब्यात घेतले आहे. पांढरकवडा शहरासह तालुक्यात विविध गावात मटका,जुगार व ईतर अवैद्य धंद्यानी रान माजविले.
जुगारावर पोलीसांनी धाड मारुन ४ लाख ८९ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल केला जप्त
अवैद्य व्यवसायीकांवर कार्यवाही (Proceedings) करण्याएैवजी काही पोलीस अधिकारी,कर्मचारी आपले आर्थीक स्तोत्र वाढविण्यावर भर देत असल्याने अवैद्य धंद्यात (Non-medical occupations) वाढ होत चालली आहे. पोलीस अधुन,मधुन जुगार,मटका अड्ड्यावर कार्यवाहीचा आव आणुन हप्तेवारीत वाढ करीत असल्याचाही आरोप करण्यात येत आहे. पिंपळखुटी येथील जुगार अड्ड्यावरुन पोलीसांनी १४ हजार ३०० रुपये रोख, १० मोबाईल, ५ दुचाकी व ईतर साहित्य असा एकुण ४ लाख ८९ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन अशोक मोहनलाल राय ६० रा पांढरकवडा, अंजनेयलु शिवन्ना मैलारम ४५, मोहम्मद लतीफ मोहम्मद समीर ४५, शेख रुस्तम शेख जमाल ५२, संतोष परशुराम दारशन ३५, सैय्यद छोटु सैय्यद जानुमिया ३७, संजय सुदर्शन पुलसवार ४० रा सर्व अदिलाबाद, सैय्यद शकील सैय्यद निजाम ४० रा जंमगाव आसीफाबाद, प्रविण अशोक चांदेकर ३५ रा पिंपळखुटी, इमरान शकुर खिलची ४२ रा पाटणबोरी, मारोती गंगाराम उईके २२ रा चिट्यालबोरी अदिलाबाद या अकरा जुगार्यांना ताब्यात घेवुन त्यांच्या विरुध्द विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहे.