आशिष जयस्वाल यांच्यातर्फे कार्यक्रम आयोजित!
हिंगोली (Rakhi Purnima Festival) : भाजपच्या वतीने राखी पौर्णिमा उत्सव उत्साहात साजरा करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. त्यानुसार शहरातील प्रभाग क्रमांक 1 मध्ये आशिष जयस्वाल यांच्यातर्फे कार्यक्रम आयोजित केला असता, त्यात शेकडो भगिनींनी त्यांना राख्या बांधल्या.
भाऊ व बहिणींच्या अतूट नात्यांचे प्रेम म्हणजे रक्षाबंधन!
भाऊ व बहिणींच्या अतूट नात्यांचे प्रेम म्हणजे रक्षाबंधन होय. प्रत्येक भाऊ आपल्या बहिणीच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहावा याच उद्देशाने परंपरेनुसार राखी पौर्णिमा उत्सव साजरा केला जातो. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) हे ज्याप्रमाणे प्रत्येक बहिणींच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात त्याच पद्धतीने प्रत्येक भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या पक्षासह इतर भगिनींच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांच्या अडीअडचणी सतत सोडवाव्यात अशा सूचना पक्षातर्फे दिलेल्या आहेत. याच निमित्ताने आमदार तानाजीराव मुटकुळे, भाजपा जिल्हाध्यक्ष गजाननराव घुगे, माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर, भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष शिवाजीराव मुटकुळे, भाजपा व्यापारी आघाडी जिल्हाध्यक्ष प्रशांत उर्फ गोल्डी सोनी यांच्या मार्गदर्शनाखाली हिंगोली शहरातील प्रभाग क्रमांक 1 मधील भाजपाचे युवा नेता आशिष जयस्वाल हे प्रभागासह इतर महिलांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत असतात. त्या निमित्ताने 9 ऑगस्ट रोजी प्रभागातील शेकडो महिलांनी आशिष जयस्वाल यांना औक्षण करून राख्या बांधल्या. यावेळी त्यांनी बोलताना कुणाच्याही कोणत्याही अडचणी असल्यास त्याची सोडवणूक करण्याचा निश्चित प्रयत्न करेल, अशी ग्वाही देखील त्यांनी राखी पौर्णिमा निमित्ताने दिली.