गणवेष व शालेय साहित्य वाटप!
कन्हान (Ramakrishna Math) : रामकृष्ण मठ धंतोली, (Ramakrishna Math Dhantoli) नागपूर तर्फे बळीरामजी दखने हायस्कुल, कन्हान (Baliramji Dakhne High School, Kanhan) शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय गणवेश व शालेय साहित्य वितरित करण्यात आले. ‘स्वतः घडा व दुसऱ्यांना ही घडवा’ असा संदेश देणारे, स्वामी विवेकानंद (Swami Vivekananda) यांच्या प्रतिमेला प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रमुख पाहुण्यांचे हार व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. सचिन अल्लडवार सर होते. कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख अतिथी स्वामी ब्रहमयानंदजी महाराज, तसेच श्री. अरूण राऊत, श्री. शहा, श्री. गुप्ता आदी उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांचे हार व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
शिक्षकांचे व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे विशेष सहकार्य!
कार्यक्रमाला विद्यार्थ्यांची विशेष उपस्तिथी होती, मनात आनंदही तितकाच होता. कार्यक्रमाचे संचालन श्री. ज्ञानेश्वर कामडी यांनी केले. आभारप्रदर्शन श्री. सुरेश बेलनकर यांनी केले. कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी सौ. भाग्यश्री नखाते श्री. नागोराव चव्हाण, सौ. ममता बारई तसेच, इतर शिक्षकांचे व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे विशेष सहकार्य लाभले.




