Gadchiroli :- पिडीत युवतीस लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार (rape) करणार्या तसेच पिडीत युवतीची बदनामी करण्याची धमकी देणार्या दोघांना देसाईगंज पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.सुनिल पुंडलिकराव बोके, (४८), रा. गांधीवार्ड, देसाईगंज ,अक्षय कुंदनवार (३२), रा. मधुबन कॉलनी देसाईगंज अशी आरोपींची नावे आहेत.
प्राप्त माहितीनुसार सुनिल बोके याचे देसाईगंज शहरात राधा ज्वेलर्स नावाचे सोने -चांदीचे दुकान आहे. सुनिल बोके याने २३ वर्षीय पिडीत युवतीला लग्नाचे आमिष दाखवून तिचे वारंवार लैंगिक शोषण (sexual abuse) केले. कधी आपल्या देसाईंगज येथील राहत्या बंगल्यात तर कधी अलिशान कारमध्ये बलात्कार करून ‘माझ्याशी लग्न कर अन्यथा तुझे अश्लिल फोटो सोशल मिडीयावर व्हायरल करीन ’ अशी धमकी दिली. मात्र या सराफा व्यापार्याचे लग्न झाले असल्याचे निदर्शनास येताच तिने त्याच्याशी बोलणे बंद केले व त्याचा मोबाईक क्रमांक ब्लॉक केला.
भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल करून दोघांनाही अटक
यामुळे सुनिल बोके याने आपला मित्र अक्षय कुंदनवार याला तिच्यावर पाळत ठेवण्यास सांगितले. अक्षय याने पिडीतेला गाठुन सुनिलचा मोबाईल क्रमांक ब्लॅक लिस्टमधून काढून त्याला भेटण्यास बजावले. मात्र त्रास असह्य झाल्याने पिडीत युवतीने देसाईगंज पोलीस ठाण्यात १६ ऑगस्ट २०२५ रोजी तक्रार दाखल केली. तक्रार दाखल होताच पोलिसांनी आरोपीविरोधात ४२२/२०२५ कलम ६४ (२) (श्), ६९, ७८, ३५१ (२), ३ (५) भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल करून दोघांनाही अटक केली. आरोपींना न्यायालयापुढे उभे केले असता न्यायालयाने आरोपींना १९ ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी (Police custody) ठोठावली होती. यामध्ये २१ ऑगस्टपर्यंत वाढ करण्यात आली होती. या आरोपींच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यांना न्यायालयापुढे उभे केले असता न्यायालयाने दोघांचीही न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याचे आदेश दिले. त्यानुसार दोघांनाही न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले.




