आरोपींवर गुन्हे दाखल, शेतात जाणार्या तरुणीची काढली छेड…!
परभणी (Parbhani Crime Case) : सेलू आणि गंगाखेड पोलिस ठाण्यात विनयभंगाच्या दोन वेगवेगळ्या घटनांची नोंद झाली आहे. सदर (Parbhani Crime Case) प्रकरणी आरोपींवर संबंधीत पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सेलू पोलिस ठाण्यात १९ वर्षीय तरुणीने तक्रार दिली आहे. (Parbhani Crime Case) तालुक्यातील सोनवटी येथील तरुणी २ एप्रिल रोजी दुपारी ४ च्या सुमारास शेतात जात होती. तिला एकटीला पाहुन आरोपी दुचाकीवर तिच्या जवळ आला. तु शेतामध्ये एकटीच जात आहेस का, तुझ्या सोबत कोणी नाही, असे म्हणत जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. तसेच वाईट उद्देशाने पाहुन हातवारे करत तरुणीच्या मनाला लज्जा वाटेल असे कृत्य करुन विनयभंग केला.
या प्रकरणी अरुण सोळंके याच्यावर गुन्हा नोंद झाला आहे. तपास पो.ह. सुर्यवंशी करत आहेत. तर दुसरी घटना (Parbhani Crime Case) गंगाखेड पोलिस ठाणे हद्दीत डोंगरगाव (शे.) येथे घडली. या ठिकाणी रस्त्याच्या कारणावरुन मारहाण करत एका महिलेचा विनयभंग करण्यात आला. पिडीतेच्या तक्रारीवरुन अथर्व गवळी, रुपाली गवळी, पार्वती गवळी यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तपास पो.ह. मोती साळवे करत आहेत.