हिंगोली (Rashtriya Samaj Party) : राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेवजी जानकर हे मराठवाडा दौऱ्यावर असताना हिंगोली येथील शासकीय विश्रामगृह येथे कार्यकर्त्यांची व पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली.
यावेळी महादेव जानकर म्हणाले की येणाऱ्या काळात हिंगोली जिल्ह्यात रासपाची अगोदरची कार्यकारणी बरखास्त करून नवीन बांधणी करणार आहे व येणाऱ्या काळात होऊ घातलेल्या निवडणुका सर्व ताकतीने लढून रासप गाव तिथे शाखा सुरू करणार आहे व सर्व समाज बांधवांना घेऊन नवीन बांधणी करणार असल्याचे यावेळी (Rashtriya Samaj Party) राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष माजी मंत्री महादेव जानकर यांनी सांगितले.
यावेळी रासपचे राष्ट्रीय संघटक गोविंदराम सुरनर प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते मुख्य महासचिव ज्ञानेश्वर सरगर प्रदेश सरचिटणीस अजित पाटील प्रदेश उपाध्यक्ष डॉ तौफिक शेख मराठवाडा अध्यक्ष अश्रुबा कोळेकर मराठवाडा उपाध्यक्ष नामदेवराव कुरवाडे हिंगोली जिल्हाध्यक्ष डॉक्टर अनिल पौळ जाफर पठाण यशवंतराव पाबळे मुंजाजी बंडे गंगाधर माटे यांच्यासह रासपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.