हिंगोली (Farmer Loan waiver) : जिल्ह्यात ढगफुटी सदृश्य पाऊस होऊन शेत पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. संपूर्ण शेतकऱ्यांना कर्जमाफी, ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तात्काळ 50 हजार देण्यासह इतर मागण्यासाठी हिंगोली सेनगाव राज्य रस्त्यावर असलेल्या नरसी नामदेव येथे शेतकरी सेवक डॉ. रमेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्यामुळे दोन तास रस्त्याच्या दोन्हीही बाजूने वाहतूक ठप्प झाली होती.
हिंगोली जिल्ह्यातील पाचही तालुक्यात मागील काही दिवसांपूर्वी ढगफुटी सदृश्य पाऊस होऊन (Farmer Loan waiver) शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून जात शेत पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानीमुळे शेतकरी हतबल झाला असल्याने संपूर्ण कर्जमाफी, तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करणे, शेतकऱ्यांना तात्काळ 50 हजार रुपये देणे,सरासरी पेक्ष्या जास्त पाऊस, सतत ढगफुटी दृश्य पाऊस,अतिवृष्टी,महापूर, पावसाने,शेतकऱ्यांचे पिके तर गेली,जमिनी खरडून गेल्या,ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या अशा शेतकऱ्यांना, हेक्टरी दीड लाख रुपये देण्यात यावे.
कयाधू नदीवरील खरबी बंधारा रद्द करावे यासह इतर मागण्यांसाठी हिंगोली,सेनगाव रस्त्यावर असलेल्या नरसी नामदेव येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या रस्ता रोको आंदोलनात शेतकरी सेवक डॉ,रमेश शिंदे, सुधीर आपा सराफ, माधवराव कोरडे, भिकाजी कदम, दाजीबा पाटील, बाजीराव इंगोले, एकनाथ शिंदे,वैजनाथ पावडे, दत्तराव जाधव, देवराव शेळके, बंडू मुटकुळे, शामराव कावळे, केशव मुटकुळे, जेजेराम मुटकुळे, दत्तराव पडोळे, धोंडबा मोरे, दीपक मोरे, पंढरी डांगे, कवडे चेअरमन, दतराव पवार, प्रल्हाद गवळी, परसराम उगले, राजू टेमकर, विजय मोरे,अविनाश मुटकुळे,गणेश पडघान आदी शेकडोच्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते. जवळपास दोन तास रस्ता रोको चालल्याने दोन्ही बाजूला एक एक किलोमीटर पर्यंत वाहनाच्या रांगा लागल्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. यावेळी नरसी नामदेव पोलीस ठाण्याच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.