पुन्हा शेतकर्याच्या डोक्यावर कर्जाचे ओझे
बारव्हा (Paddy crop) : मागील काही दिवसापासून होत असलेल्या वातावरणाच्या बदलामुळे धान पिकावर विविध रोगाने आक्रमण केले असून धान पिक फस्त केलेली आहेत. धान पिकांवर लागलेल्या रोगांना आटोक्यात आणन्यासाठी महागडी कीटकनासक औषध फवारणी करण्यात आली. मात्र रोग आटोक्यात येत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
ऐन धानपीक निघण्याच्या तारणेत असताना (Paddy crop) धान पिकातून मोठ्या प्रमाणात पांढर्या धानाची लोंबी निघत असल्याने यंदा धान पिकाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होणार आहे. त्यामुळे लागवड खर्च निघेल याची शास्वती नसल्याने पुन्हा एकदा शेतकर्यांच्या मानगूटीवर कर्जाचे ओझे बसणार असल्याने बळीराजा चिंतातूर अवस्थेत जीवन जगत आहे.
पेरणीपासून तर धान पीक निघेपर्यंत बळीराजा या पिकांची पोटच्या गोळ्या प्रमाणे देखरेख करतो. दरवर्षी (Paddy crop) शेती व्यवसाय डुबत असला तरी मोठ्या आशेने शेती कसतो. तालुक्यात कोणतेही मोठे उद्योग नसल्याने शेती हाच मुख्य व्यवसाय आहे. दरवर्षी शेती व्यवसाय धोक्यात येत असला तरी पर्याय नसल्याने नाईलाजाने हाच व्यवसाय करावा लागतो. याच व्यवसायातून मुलांचे शिक्षण, लग्न समारंभ, कुटुंबाचा उदरनिर्वाह, यासह अन्य व्यवहार यातूनच करावे लागतात. मागील काही वर्षांपासून निसर्गाच्या उलटफेर चक्रामुळे शेती व्यवसाय डबघाईस येत आहे.
यंदा शेती व्यवसाय साथ देईल. अशी शेतकर्यांना अपेक्षा होती मात्र वारंवार हवामाणात बदल होत असल्याने (Paddy crop) धान पिकांवर विविध रोगाने आक्रमण केले. त्या रोगांना आटोक्यात आणले. मात्र त्या रोगाचा धान पिकांना फटका बसल्याने धान निसविन्याच्या तारणेत असताना धानाची लोब कमी मात्र पांढरी धानाची लोंबी जास्त निघाल्याने धानाच्या उतारीत मोठ्या प्रमाणात घट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.