लोडींग ऑटो व विजेचा लोखंडी खांब जप्त
परभणी/गंगाखेड (Parbhani stole Case) : मध्यरात्रीच्या वेळी ऑटोमध्ये टाकून विजेचा लोखंडी खांब चोरून नेणाऱ्या तिघांना रात्र गस्तीवर असलेल्या पोलीसांनी ताब्यात घेत सोमवार 12 मे रोजी गंगाखेड पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की (Parbhani stole Case) गंगाखेड पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक विशाल बुधोडकर, जमादार मुंजा वाघमारे, चालक शेख कलंदर, होमगार्ड गोविंद मुंडे आदी रविवार रोजी रात्र गस्तीवर असतांना मध्यरात्री 2 वाजेच्या सुमारास लाल रंगाच्या ऑटोमध्ये काही जण एमएसईबीचा लोखंडी खांब क्लॅमसह घेऊन जात असल्याचे दिसल्याने पालम रस्त्यावरील इटारसी नदी पुलाजवळ ऑटो थांबवून चालक शेख मुन्वर, जम्मू खुरेशी, शेख समद यांना विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने पोलीस उपनिरीक्षक विशाल बुधोडकर यांनी यातील एकास ताब्यात घेतले तर दोघांनी अंधाराचा फायदा घेऊन पळ काढला असता (Parbhani stole Case) रस्त्यावरील काही तरुणांच्या मदतीने विजेचा लोखंडी खांब ट्रॅक्टरमध्ये टाकून पोलीस ठाण्यात आणला.
एमएसईबीचे शहर अभियंता पंकज गुवे यांना बोलावून घेत लोखंडी खांब एमएसईबीचा असल्याची खात्री करून घेत विजेचा लोखंडी खांब व एमएच 04 ईवाय 2933 क्रमांकाचा लोडींग ऑटो जप्त करून पोलीस उपनिरीक्षक विशाल पुरुषोत्तम बुधोडकर यांच्या फिर्यादीवरून मुन्वर, जम्मू खुरेशी दोघे रा. ममता कॉलनी व शेख समद रा. रमाबाई नगर गंगाखेड या (Parbhani stole Case) तिघांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास जमादार मारोती माहोरे करीत आहेत.




 
			 
		

