अध्यक्षपद सर्वसाधारण असल्याने मोठी आर्थिक उलाढाल होण्याचे चिन्ह!
रिसोड (Risod Municipal Council) : न्यायालयाच्या आदेशानुसार मोठ्या विलंबाने नगरपरिषद निवडणूकांना (Municipal Council Election) निवडणुक आयोगाने हिरवा झेंडा दाखविल्याने रिसोड शहरातील आगामी नगरपरिषदेची अध्यक्ष पदाची निवडणूक म्हणजे राजकिय थरार निर्माण होण्याचे संकेत राजकिय वर्तुळात चर्चीले जात आहेत.नगराध्यक्षपद हे सर्वसाधारण आसल्याने महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) आपला अध्यक्ष पदाचा उमेदवार जवळ, जवळ घोषीत केल्याचे दिसते तर महायुतीतील राजकिय भिष्माचार्य उमेदवार घोषीत करण्यास धजावत असल्याची खमंग चर्चा शहरातील प्रत्येक वार्डात रंगत आहे. अध्यक्षपद सर्वसाधारण असल्याने मोठी आर्थिक उलाढाल होण्याचे चिन्ह दिसत आहे.
निवडणूक मोठ्या चुरशीची होण्याचे राजकिय संकेत!
रिसोड नगरपरिषद मध्ये एकूण 11 प्रभाग तर 23 नगरसेवक हे 29962 मतदारांमधून निवडून येणार आहेत.विशेष म्हणजे यावेळी नगराध्यक्ष पदाचे आरक्षण सर्व साधारण सुटल्याने अध्यक्ष पदासाठीच उमेदवार म्हणुन आपला राजकीय दृष्टिकोन समोर ठेवत 28 फेब्रुवारी 2023 रोजी स्वच्छानिवृत्ती घेणारे नगरपरिषद अभियंता बाळासाहेब देशमुख हे जवळ,जवळ पक्के झाल्याची सुत्रांची माहीती आहे,तर येथिल नगरपरिषदची सता स्थापने पासुनच सर्वाधिक काळ माजी खा.अनंतराव देशमुख यांच्या गटाकडे राहीलेली आहे. सुरुवातीच्या काळात माजी खा.देशमुख यांच्याच तालमीत राजकारणाचे बाळकडू राजकीय कर्मचारी म्हणून बाळासाहेब देशमुख यांनी घेतले आहे. त्याची प्रचिती सन 2009 मध्ये संपन्न झालेल्या रिसोड नगरपरिषद अंतर्गत वार्ड क्रमांक 1 मधील लढती मध्ये अनंतराव देशमुख यांचे पुत्र अॅड.नकुलदादा देशमुख विरूद्ध बाळासाहेब देशमुख यांचे बंधु डाॅ.चंद्रशेखर देशमुख यांच्यात तुल्यबळ लढती मध्ये दिसली होती ,यामध्ये डाॅ.चंद्रशेखर देशमुख यांना 52 मतदान विजय मिळवला होता. ही आठवण आजही राजकिय वर्तुळात नेहमीच चर्चेली जात असते.आज घडीला महाविकास आघाडीने बाळासाहेब देशमुख यांच्या रूपाने नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जवळपास निश्चित केले आसतांनी महायुती अद्यापही नगराध्यक्ष पदाचा उमेदवारा साठी वेट अॅण्ड वाॅच ची भुमिकेत दिसत आहे.विशेष म्हणजे माजी खा.अनंतराव देशमुख यांनी रिसोड नगरपरिषद अध्यक्ष पदाचे उमेदवार आपल्या परिवारातील देण्याची ईच्छा शहरातील अनेकांनी व्यक्त केलेलीच आहे.आणि सन 2009 सालच्या निवडणुकीतील निकालाचा वाचपा घेण्याची हीच वेळ आसल्याचे बोलल्या जात आहे. भाऊ च्या परिवारातील सदस्य नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढला तरच ही निवडणूक मोठ्या चुरशीची होण्याचे राजकिय संकेत दिसत आहे. यामुळेच मतदार सुद्धा मोठ्या उत्साहाने मतदानाला बाहेर पडेल मागील विधानसभा निवडणुकीत महायुती अल्पशा मताने अनंतराव भाऊंचा पराभव झाल्याने त्यांच्याबद्दल मतदारांमध्ये सहानुभूती आहे ती नगरपालिकेच्या निवडणुकीत कॅश होण्याची संधी दिसत आहे रिसोड नगरपरिषद निवडणुकी साठी युती होणार का? ही युती झाल्यास मागील अनेक महीण्या पासुन अनेक ईच्छुक नगरसेवकांनी आप,आपल्या वार्डातुन निवडणुकीची जय्यत तयारी केलेली आसतांनी युती झाल्यास महायुती मध्ये नाराजीचे बंड होणार हे नक्कीच होणार आसल्याची खमंग चर्चा शहरातील वार्डा,वार्डातील मतदारा मध्ये रंगत आहे.मागील काही महिन्यांपासून बाळासाहेब देशमुख यांनी आपला नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणुन प्रचाराला गती दिलेली दिसते,त्याला त्याच पध्दतीचा शहरवाशीयांचा प्रतिसादही लाभलेला दिसत आसतांनी महायुती मात्र येथिल नगराध्यक्ष पदाचा उमेदवार घोषीत करण्यास धजावत आसल्याने नानाविध राजकिय चर्चेला या दिपावलीच्या मुहूर्तावर रंग चढत आहे.