अवैधदारू विरोधात पोलिसांच्या कारवाईत सातत्य हवे, महिलांची अपेक्षा
रिसोड (Illegal liquor Action) : तालुक्यातील कु-हा येथिल मोठ्या प्रमाणात मजुरी करणा-या महिला गावातील अवैध दारू विक्रीला कंटाळुन थेट रिसोड पोलिस स्टेशन ला धडकल्या कारण गावातील (Illegal liquor Action) अवैध देशी दारू विक्रेत्यांची मुजोरी आणि दारूने होत आसलेल्या संसाराची राखरांगोलीची आपबिती पोलिसां पुढे कथन केल्या नंतर रिसोड पोलिसांनी कु-हा येथिल एक इसमावर ता.3 ऑगस्ट ला कारवाई केली आहे.
ग्राम कु-हा येथिल महीला मंडळ यांनी गावातील (Illegal liquor Action) दारुबंदी संबधाने पो.स्टे.ला सार्वजनिक निवेदन दिल्याने माननीय पोलीस निरीक्षक रामेश्वर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पो उप नी नागरे,पोउपनि वसंत तहकीक,पो.काँ.825,06 यांनी पंचासह ग्राम कुऱ्हा येथील 3 ठिकाणी छापा कार्यवाही केली असता अवैध दारू विक्रेता सुभाष एकनाथ नागरे वय 52 वर्ष रा.कु-हा ता.रिसोड जि.वाशिम याचे ताब्यातून 16 नग देशी दारु भिंगरी संत्रा किंमत अंदाजे 1120/रु ची दारु मिळुन आली.
तसेच ग्रामपंचायत कार्यालय येथे पोलीस पाटील, गावातील प्रतिष्ठित नागरिक व निवेदनकर्त्या महिलांची मीटिंग घेऊन गावात कोणीही व्यक्ती अवैधरीत्या दारू विक्री करत असल्यास त्याची माहिती पोलीस स्टेशन रिसोड व बीट अधिकारी यांना द्यावी त्यांचे नाव गुपित ठेवून (Illegal liquor Action) अवैध दारू विक्रेत्याविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल बाबत सूचित केले.