Yawatmal :- हवामान विभागाने (Department of Meteorology)जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट (Orange Alert)जाहीर करण्यात आला आहे. या कालावधीत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असून मंगळवारी सकाळपासून बरसलेल्या मध्यम ते मुसळधार पावसाने ९ तासातच जिल्ह्यात ७२ मि.मी पावसाची नोंद करण्यात आली.
९ तासांच्या बरसलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील काही जल प्रकल्पांमधील जलसाठ्यात ५० टक्क्याच्या वर वाढ झाली
हवामान विभागाने १२ ऑगस्ट रोजी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार १२ ते १४ ऑगस्ट या कालावधीत जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे. या दोन दिवसांच्या कालावधीत विजांच्या कडकडाट्यासह मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली. असताना जिल्ह्यात १३ ऑगस्ट मंगळवार सकाळपासून पावसाने हजेरी लावली आहे. जिल्ह्यातील यवतमाळ, राळेगाव, बाबुळगाव, या तीन तालुक्यांमध्ये मध्यन स्वरूपाचा पाऊस बरसला आहे. तर उर्वरित ११ तालुक्यात रिमझिम पाऊस (Rain) बरसला त्यामुळे जिल्ह्यात ९ तासात ७२ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. या ९ तासांच्या बरसलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील काही जल प्रकल्पांमधील जलसाठ्यात ५० टक्क्याच्या वर वाढ झाली आहे.




