जि.प.मुख्य कार्यकारी अधिकार्यांकडे ग्रामस्थांची लेखी तक्रार
परभणी (Rojgar Hami Yojana) : ताडकळस येथुन जवळच असलेल्या देऊळगाव दुधाटे येथील रोजगार हमी योजनेअंतर्गत (Rojgar Hami Yojana) मातोश्री पांदन रस्त्यांचे कामे ही अतिशय निकृष्ट दर्जाची झाली असून या कामाचे पूर्ण काम झाल्याशिवाय कुशलची बिले काढण्यात येऊ नयेत तसेच गाव अंतर्गत सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लॉकचे काम झाले असून हे काम अंदाज पत्रकाप्रमाणे करावे अशी लेखी तक्रार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकार्यांकडे ग्रामस्थांनी केली आहे.
याबाबत देऊळगाव दुधाटे येथील विविध सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन तुकाराम त्र्यंबकराव दुधाटे, केशव उत्तमराव दुधाटे, किशनराव रूस्तुमराव, सखाराम मारोतराव दुधाटे यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांकडे लेखी तक्रार केली आहे.
या तक्रारीत नमूद केले आहे की, देऊळगाव दुधाटे येथे सन २०२२-२३ मध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (Rojgar Hami Yojana) मातोश्री पांदन योजनेतुंन देऊळगाव दुधाटे ते गोळेगाव, देऊळगाव दुधाटे ते मुंबर, धानोरा काळे रस्ता ते सखाराम दुधाटे, देऊळगाव दुधाटे ते फुलकळस कालवा, विठ्ठल विश्वनाथ ते दत्त मंदिर, देवठाणा शिव ते व्यकंटी गणपती ते शेषेराव बखल या पाणंद रस्त्यांचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले आहे.
काही ठिकाणी फक्त दगडाचे मेटल टाकले आहे.तर काही रस्त्यांचे कामच न करता बिल उचलले आहे. तसेच गाव अंतर्गत सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लॉकचे काम झाले असून या कामाची देखील चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.