भुवनेश्वर (Royal Bengal Tiger) : ओडिशामध्ये वाघांची संख्या वाढवण्यासाठी महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातून 5 रॉयल बंगाल टायगर (Royal Bengal Tiger) आणण्याची योजना आखण्यात आली आहे. वन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबरपर्यंत वाघ येण्याची शक्यता आहे. प्रधान मुख्य वनसंरक्षक (PCCF-वन्यजीव), सुशांत नंदा यांनी सांगितले की, 3 वाघांना डेब्रिगढ वन्यजीव अभयारण्य, संबलपूर येथील बारगढ येथे सोडले जाईल, तर उर्वरित दोन वाघांना मयूरभंज जिल्ह्यातील (Similpal Tiger Reserve) सिमिलपाल व्याघ्र प्रकल्पात आणले जाणार आहे.
वनसंरक्षक सुसंता नंदा यांनी सांगितले की, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या दोन्ही राज्यांनी त्यांचे वाघ ओडिशात स्थानांतरित करण्यास संमती दिली आहे. त्यांनी त्यांच्या जंगलातील मुख्य भागातून वाघ ओळखले आहेत. वाघांची पाहणी करण्यासाठी ओडिशातील वन अधिकाऱ्यांची दोन पथके 7 दिवसांत दोन राज्यांना भेट देणार आहेत.
ओडिशाच्या 47 वन विभागात फक्त 30 वाघ
ओडिशाच्या 47 वन विभागांमध्ये (Forest Departments) 2023-24 दरम्यान प्रथमच आयोजित केलेल्या वाघांच्या मूल्यांकनात, विक्रमी 30 वाघ आणि आठ शावकांची नोंद झाली आहे. या 30 (Royal Bengal Tiger) रॉयल बंगाल टायगर्सपैकी 27 सिमिलपाल टायगर रिझर्व्ह (STR) मध्ये सापडले. केओंझर प्रादेशिक आणि (Forest Departments) वन्यजीव विभाग, परळखेमुंडी प्रादेशिक आणि हिराकुड वन्यजीव विभागामध्ये प्रत्येकी एक वाघ होता.
नंदनकानन प्राणी उद्यानात नवीन सदस्य
नंदनकानन प्राणी उद्यान (Odisha Sanctuary) या महिन्याच्या अखेरीस दोन जिराफांचे स्वागत करणार आहे. प्राणी विनिमय कार्यक्रमांतर्गत कोलकाता येथील अलीपूर प्राणी उद्यानातून हे जिराफ आणले जातील. सध्या प्राणीसंग्रहालयात ‘खुशी’ नावाचा जिराफ आहे. दोन नवीन जिराफांचे आगमन प्राणीसंग्रहालयातील प्राण्यांच्या संख्येत आणखी वैविध्य आणेल.
नर सिंह ‘कृष्णा’चा मृत्यू
दरम्यान, नंदनकानन प्राणीसंग्रहालयात (Odisha Sanctuary) 2004 मध्ये जन्मलेल्या नर सिंह ‘कृष्णा’चा बुधवारी वृद्धापकाळाने मृत्यू झाला. हे प्राणीसंग्रहालयातील प्राणी समुदायाचे लक्षणीय नुकसान आहे.




