भिलेवाडा-खमारी मार्गावरील सुरेवाडा येथील घटना
खमारी/बुटी (School Van Accident) : भंडारा तालुक्यातील भिलेवाडा- खमारी(बुटी) मार्गावरील सुरेवाडा गावाजवळ भरधाव स्कूल व्हॅन उलटल्याने, झालेल्या अपघातात ४ ते १० वर्षेवयोगटातील ६ विद्यार्थ्यांसह चालक जखमी झाले. (School Van Accident) अपघातानंतर सर्व जखमींना उपचारासाठी भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालय (Bhandara Hospital) येथे दाखल करण्यात आले. सदर घटना गुरुवार, दि. १६ ऑक्टोबर रोजी दुपारी १.४५ वाजता दरम्यान शाळेतून विद्यार्थी घरी व्हॅनमधून परत जात असतांना घडली. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे हा अपघात घडल्याची माहिती आहे.
जखमी विद्यार्थ्यांमध्ये अवेंद्र योगेश भोयर(८), सानिध्या रामप्रकाश चोपकर(८) रा.खमारी, उर्वेश दिपक बेदरकर(४), सानवी दिपक बेदरकर(६), रुद्रानी उमेश बेदरकर(८) रा. मांडवी व गर्ग ईश्वर मेश्राम(४) रा.माटोरा असे असून चालक उमेश पंजाब मेश्राम (२५) रा. मांडवी असे विद्यार्थ्यांसह जखमी चालकाचे नाव आहे. सुदैवाने अपघातात जिवितहाणी झाली नाही.
प्राप्त माहितीनुसार, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले कॉन्व्हेंट बेरोडी येथील ४ ते १० वर्षेवयोगटातील विद्यार्थ्यांना शाळा सुटल्यानंतर जवळपास १७ विद्यार्थ्यांना मारुती स्कूल व्हॅन क्र. एम.एच. ४७/बी.बी. ५८६४ ने बेलगाव, मांडवी, खमारी, माटोरा येथील विद्यार्थ्यांना घरी सोडण्यासाठी जात असतांना खमारी/बुटी मार्गावरील सुरेवाडा गावाजवळ खड्डे चुकविण्याच्या नादात चालकाचे नियंत्रण सुटले आणि स्कूल व्हॅन पुलावरून खाली कोसळली.
सदर अपघातात ६ विद्यार्थी व चालक जखमी झाले. अपघात घडताच गावकर्यांनी घटनास्थळी धाव घेतली. (School Van Accident) अपघाताची माहिती मिळताच कारधा पोलिस स्टेशनचे पोलीस निरिक्षक गोकुल सुर्यवंशी, पोहवा संदिप केंद्रे, पोशि रजनीकांत मुरकुटे ताफ्यासह घटनास्थळी धाव घेतली. अपघाताची माहिती जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य रुग्णवाहिकाचालक यांना माहित होताच त्यांनी तातडीने घटनास्थळी पोहचून सर्व जखमी विद्यार्थ्यांना भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालय येथे उपचारासाठी पोहचविले.
त्यांचेवर उपचार करून सुटी देण्यात आली. त्यातील एका विद्यार्थ्यावर (Bhandara Hospital) रुग्णालयात उपचार सरु आहे. (School Van Accident) घटना घडताच घटनास्थळी व रुग्णालयात विद्यार्थ्यांच्या पालकांची मोठी गर्दी झाली होती. तसेच घटनेचे गांभिर्य लक्षात घेता कारधा येथील सावित्रीबाई फुले स्कूल/शाळेचे प्राचार्य व शिक्षकवृंद सुध्दा पोहचले होते. अपघातग्रस्त स्कूलव्हॅनमध्ये जवळपास १७ विद्यार्थी असल्याची बाब पुढे येत आहे. अपघाताची नोंद कारधा पोलिसांत केली असून पुढील तपास पोहवा संदीप केंद्रे करीत आहेत.