चुडावा ते कावलगाव रोडवरील घटना; तीन जणांवर गुन्हा दाखल..!
परभणी (Parbhani soybean stolen) : पूर्णा तालुक्यामधील चुडावा शेत आखाड्यावर ठेवलेले सोयाबीनचे २१ पोते चोरट्यांनी लंपास केले. ही घटना १० जुलै रोजी सकाळी दहाच्या सुमारास चुडावा ते कावलगाव रोडवर गट क्रमांक २३१ मधील शेत आखाड्यावर घडली. या (Parbhani soybean stolen) प्रकरणी तीन जणांवर चुडावा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रंगनाथ बालाजीराव देसाई यांनी तक्रार दिली आहे. सतीश ज्ञानदेव भोसले, शेख शब्बीर शेख वजीर, प्रभुदास चांदू भिसे यांच्यावर गुन्हा नोंद झाला आहे. आरोपी सतीश भोसले हा फिर्यादीच्या शेतामध्ये सालगडी म्हणून कामाला आहे. संबंधिताने इतर दोघांच्या मदतीने मिळून ४३ हजार रुपयांचे सोयाबीन चोरले. १० जुलै रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास फिर्यादीचे चुलते आणि दुसरा सालगडी शेत आखाड्यावर असताना त्यांना अॅटोमधून सोयाबीनचे पोते नेले जात असल्याचे चौकशीत समजून आले.
त्यानंतर सोयाबीन ठेवलेल्या ठिकाणांची पाहणी केली असता ४३ हजार रुपये किंमतीचे २१ पोते सोयाबीन कमी दिसून आले. संगणमत करत शेत आखाड्यावरुन सोयाबीनची चोरी केल्या (Parbhani soybean stolen) प्रकरणी परभणीच्या चुडावा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तपास पोहेकॉ. दत्ता खाडे करत आहेत.