मानोरा (Sakal Banjara Samaj) : बंजारा समाजाला अनुसूचित जमाती ( एसटी ) प्रवर्गामध्ये समाविष्ट करून एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मानोरा तालुक्यातील (Sakal Banjara Samaj) सकल बंजारा समाज बांधवांचा दि. १७ सप्टेंबर रोजी क्रांतिकारी संत सेवालाल महाराज यांच्या झेंडा चौकातून निघालेला मोर्चा तहसील कचेरीवर धडकला. मोर्चेकरांनी तहसीलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन सादर केले.
ऐतिहासिक दृष्ट्या मूळ आदिवासी अनुसूचित जमाती ( एसटी ) प्रवर्गात हैदराबाद गॅजेटच्या नोंदी आधारे जिल्हा गॅझेट महसूल रेकॉर्डमध्ये पुरावे स्पष्टपणे दर्शवीत असल्यामुळे एसटी प्रवर्गात समाविष्ट करून आरक्षण द्यावे, या मागणीसाठी शहरातील संत सेवालाल महाराज चौकातून निघालेला मोर्चा तहसील कार्यालयावर पोहोचला.
महाराष्ट्र शासनाने हैदराबाद गॅजेट संबंधी निघालेला जी.आर. बंजारा समाजाला लागू करून त्यांना तात्काळ अनुसूचित जमाती ( एसटी प्रवर्गात ) समाविष्ट करावे, अशा मागणीचे निवेदन तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री यांच्याकडे सादर करण्याकरिता देण्यात आले. मोर्चाला संबोधित करताना मोर्चात सहभागी (Sakal Banjara Samaj) बंजारा समाजातील जेष्ठासह तरुण युवक व महिला भगिनीनी आपल्या समाजाच्या व्यथा मांडून एसटी आरक्षणाची मागणी रास्त असल्याचे सांगितले.
या मोर्चात हजारोच्या संख्येने मानोरा तालुक्यातील (Sakal Banjara Samaj) सकल बंजारा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. या आरक्षण एल्गार मोर्चात गोरसेना गोर शिकवाडी, वसंत सेना, राष्ट्रीय बंजारा परिषद आदीसह इतर बंजारा समाजाच्या संघटनेचे पदाधिकारी आदींनी आवर्जून हजेरी लावली होती. आठवडी बाजाराच्या दिवशी पोलिसांनी शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.




