रिसोड (Samata Divyajyot Abhiyan) : ग्रामपंचायत मांगूळ झनक येथे रविवार 10 ऑगस्ट रोजी समता दिव्यज्योत अभियान (Samata Divyajyot Abhiyan) अंतर्गत मोफत नेत्र तपासणी शिबाराचे आयोजन जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा मांगुळ झनक येथे करण्यात आले होते. या शिबाराचे उद्घाटन मा. आमदार अमित झनक व मा. उत्तमचंद बगडिया साहेब यांच्या हस्ते करण्यात आले.
शिबारामध्ये 105 रुग्णाची नेत्र तपासणी करण्यात आली, त्यामध्ये 20 रुग्णांना मोतीबिंदू आढळून आला. मोतीबिंदू रुग्णाची शस्त्रक्रिया उदयगिरी लायन्स हॉस्पिटल उदगीर या ठिकाणी करण्यात येईल. मागूळ झनक येथे प्रत्येक महिण्याच्या दुसऱ्या रविवारी निशुल्क नेत्र तपसणी शिबीर आयोजित केल्या जाईल.या शिबिरात मध्ये मोतीबिंदू शस्त्रक्रिया उदयगिरी लायन्स हॉस्पिटल उदगीर. आचार्य विनोबा भावे आय हॉस्पिटल वर्धा येथे (Samata Divyajyot Abhiyan) समता फॉउंडेशन कडून निशुल्क केल्या जाणार आहेत. शिबिराच्या यशस्वीतेसाठी समता फॉउंडेशन च्या संपूर्ण टीमने प्रयत्न केले