जिल्ह्यातील सर्व सामाजिक संघटना व सेवाभावी संस्थाना या कार्यक्रमात सहभागी!
रिसोड (Samata Foundation) : समता फाउंडेशनच्या सामाजिक कार्याची दखल घेत माननीय जिल्हाधिकारी यांनी जलतारा वत्सगुल्म स्पर्धेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमात समता फाउंडेशन या सेवाभावी संस्थेचा सत्कार केला. हा कार्यक्रम 21 जून रोजी वटाणे सभागृह वाशिम येथे जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. 1 मार्च ते 30 मे दरम्यान जलतारा उपक्रमांतर्गत संपूर्ण वाशिम जिल्ह्यामध्ये जलतारा खड्डे खोदण्यात आले. जलतारा उपक्रम ही एक लोक चळवळ व्हावी या दृष्टीने जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील सर्व सामाजिक संघटना व सेवाभावी संस्थानां या कार्यक्रमात सहभागी केले होते. जिल्हाधिकारी यांच्या महत्त्वकांक्षी जलतारा उपक्रमास जिल्ह्यातून सर्व संघटनांनी (Organizations) भरघोस प्रतिसाद दिला.
जलतारा उपक्रमामधील समता फाउंडेशनचा सहभाग!
रिसोड तालुक्यांमध्ये जलतारा उपक्रमामध्ये समता फाउंडेशनने पुढाकार घेत 6563 जलतारा खड्ड्यांपैकी 2804 खड्डे शेतकऱ्यांना खोदून दिलीत. समता फाउंडेशनच्या या सहकार्याने संपूर्ण वाशिम जिल्ह्यामधून वाघी या गावाला तिसऱ्या क्रमांकाचे बक्षीस मिळाले तर रिसोड तालुक्यातील स्पर्धेमध्ये कंकरवाडीला प्रथम क्रमांकाचे तर घोटा गावाला द्वितीय क्रमांकाचे व गोहगावला तृतीय क्रमांकाचे बक्षीस मिळाले. जलतारा उपक्रमामधील (Jaltara Activities) समता फाउंडेशनचा सहभाग व आरोग्य, शिक्षण, स्वयंरोजगार, जलसिंचन क्षेत्रातील सामाजिक कार्याची (Social Work) दखल घेत वाशिम जिल्हाधिकारी यांनी समता फाउंडेशनचा सत्कार केला. समता फाउंडेशनच्या (Samata Foundation) वतीने कोर कमिटीचे सदस्य उत्तमचंदजी बगडे, संजय उकळकर, संतोष वाघमारे व समता ग्रुपचे जलतारा उपक्रमाचे इन्चार्ज सुरज गुप्ता यांनी सत्कार स्वीकार केला. याप्रसंगी वाशिमचे आमदार शामजी खोडे, विधान परिषदेचे आमदार किरणराव सरनाईक, पोलीस अधीक्षक तारे साहेब, सर्व प्रशासकीय अधिकारी व जलतारा प्रकल्पामध्ये सहभागी असलेले जिल्ह्यातील सर्व शेतकरी उपस्थित होते. माननीय जिल्हाधिकारी (Collector) यांनी समता फाउंडेशनच्या कार्याची दखल घेत सत्कार केल्याबद्दल उत्तमचंद बगडिया यांनी जिल्हाधिकारी यांचे आभार व्यक्त केले.