परभणी/जिंतूर (Sand Mafia) : तालुक्यातील पिंपळगाव गायके परिसरातून वाहणाऱ्या दुधना नदीच्या पात्रात रेतीचे अवैध साठे, (Sand Mafia) रेती माफिया यांनी करून ठेवल्याची आढळून आले. या वाळूच्या ठेवलेल्या साठ्याकडे (Revenue Administration) महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्यामुळे या व्यवसायातून लाखो रुपयांची कमाई केली जात आहे.
परभणीत वाळू माफियाकडून दुधना नदीच्या पात्रात रेतीचे साठे
या अवैधे कमाईतून गुन्हेगारी वाढण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात झाले आहे. यासाठी पोलीस व (Revenue Administration) महसूल विभागाने अवैध रित्या वाळू उपसा होणाऱ्या प्रकाराकडे दुर्लक्ष झाल्यामुळे नदीच्या पात्रात मोठ मोठे साठे वाळूचे करून ठेवले आहेत. या रेतीच्या उपशामुळे नदीचे पात्र नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. या अवैधरित्या उपसा करणाऱ्या (Sand Mafia) वाळू माफियाकडे जिल्हाधिकारी यांनी लक्ष द्यावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
जिंतूर तालुक्यातील पिंपळगाव गायके परिसरात प्रकार
सध्या पावसाळ्याचे दिवस जवळ येऊन ठेपल्यामुळे रेती साठा करण्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. रेती उपसामुळे पिंपळगाव गायके परिसरात दुधना नदीच्या पात्रात मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहेत. पावसाळ्यात हे खड्डे धोकादायक होऊ शकतात. रेती उपशावर बंदी असताना सुद्धा दिवसाढवळ्या (Dudhana river) दुधना नदीच्या पात्रात (Sand Mafia) रेती माफ्याकडून अवैध रित्या मोठे मोठे वाळूची केली जातात या प्रकाराकडे कोणाचे अभय आहे अशी चर्चा होत आहे.