सिसिटिव्ही कॅमेर्यातुन मिळु शकतो पुरावा
पांढरकवडा (Sand Smugglers) : रेती तस्करांसाठी रान मोकळे करुन देणार्या तहसिलदाराचे एक, एक कारणामे पुढे येत असतांना सुध्दा त्यांच्यावर कोणतीही कार्यवाही होत नसल्याने चक्क जिल्हाधिकार्यांच्याच कार्यप्रणाली विरुध्द आता तालुक्यातील सामान्य जनता प्रश्न उपस्थित करु लागली आहे. चक्क शासकीय सुट्टीच्या दिवशी सुध्दा तहसिलदार महोदय (Sand Smugglers) रेती तस्करांसोबत कार्यालयात गुप्तगु करीत असल्याने आता तरी जिल्हाधिकारी महोदय त्यांच्यावर कार्यवाही प्रस्तावित करणार का?. असा प्रश्न तालुक्यातील नागरिक करु लागले आहे.
शनिवार शासकीय सुट्टी असतांना सुध्दा रेती तस्करीमध्ये तालुक्यात नाव डंक्यावर असलेले काही (Sand Smugglers) तस्करी चक्क तहसिल कार्यालयात तहसिलदाराची गुप्तगु करीत होते. याचा पुरावा तहसिल कार्यालयात लावुन असलेल्या सिसिटीव्ही कॅमेर्यातुन सहज मिळु शकतो. तालुक्यात रेती तस्करांनी रान माजविले असतांना त्यांच्यावर कार्यवाहीच्या नावावर थातुर, मातुर एक, दोन छोट्या वाहनावर कार्यवाह्या करुन सेटिंग करण्याचे प्रकार सद्या महसुल विभागात सुरु आहे.
तालुक्यातील काही तलाठी तथा मंडळ अधिकार्यांनी सुध्दा रेती तस्करीत आपले हात धुणे सुरु केले आहे. मद्यतंरी उपविभागीय अधिकार्यांनी रेती तस्करां विरुध्द कार्यवाहीचा सपाटा सुरु केला होता. मात्र आता त्यांच्या कार्यवाहीची तलवार सुध्दा म्यॉन झाल्याचेच दिसत आहे.
पाटणबोरी, वारा, कवठा, पिंपळखुटी, अर्ली, पिंपरीबोरी, टेंभी, चालबर्डी, पांढरकवडा, रुढा, करंजी रोड येथील तलाठी व मंडळ अधिकार्यांसह तहसिलदारांचे मोबाईल कॉल डिटेल्स काढल्यास रेती तस्करीचे मोठे घबाड उघडकीस येवु शकते. तालुक्यासह शहरात सुध्दा अनेक ठिकाणी रेतीची साठवणूक करुन ठेवलेली आहे. या साठ्यावर कार्यवाही करण्याएैवजी त्याचेही आर्थीक भांडवल करण्यात येत आहे.
तालुक्यातील वाराकवठा येथील खुनी नदीच्या काठावरील एका शेतात मोठ्या प्रमाणात रेतीची साठवणुक करुन आहे. त्याच प्रमाणे हायवेवरील कोंघारा येथील सुध्दा शेतात रेतीची मोठ्या प्रमाणात साठवणुक करुन ठेवुन आहे. कोंघारा येथील शेतातील रेतीचा साठा तर चक्क हायवेवरुन सुध्दा निर्देषणास येत असतांना त्या रेती साठ्यावर कार्यवाही करण्याची हिम्मत तहसिलदार का दाखवित नाही?. असाही प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
विशेष म्हणजे तालुक्यात रेती तस्करीमध्ये अनेक पांढरपेशी सक्रीय झाले आहे. राजकीय मंडळी व आर्थीक मलीदा हा दुहेरी संगम होत असल्यानेच तहसिलदार अशा (Sand Smugglers) रेती साठा व तस्करीकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिक करीत आहे. म्हणुनच तर चक्क शासकीय सुट्टी दिवशी सुध्दा त्यांच्या कार्यालयात खुलेआम पध्दतीने रेती तस्करांच्या येरझारा सुरुच असतात.