66 लाख 50 हजाराचा मुद्देमाल जप्त!
नांदेड (Sand Smuggling) : जिल्हयामध्ये वाळु माफीयाकडुन (Sand Mafia) अवैध मार्गाने वाळू उपसा व वाहतुक करून शासनाचा लाखो रूपयाचा महसुल बुडविला जात असल्याने पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी दिलेल्या आदेशानुसार स्थानिक गून्हे शाखेच्या (Local Criminal Branch) पथकाने 29 जुलै रोजी भनगी येथील गोदावरी नदी पात्रावर कारवाई केली. या कारवाईत रेती उपसा करण्यासाठी लागणारे 66 लाख 50 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून, नांदेड ग्रामीण पोलिसांनी (Nanded Rural Police) गुन्हा दाखल केला आहे.
रेती उपसा करणारे मालकाविरुद्ध गुन्हा दाखल!
स्थागुशाचे पोनि उदय खंडेराय यांचे एक पथक तसेच नांदेड ग्रामीणचे पोनि ओमकांत चिंचोलकर यांच्या पथकांनी भनगी गोदावरी नदीपात्रात छापा कार्यवाही करून अवैध रित्या रेती उपसा करणारे 8 इंजन, एक ट्रेक्टर हेड, पाण्यावर तरंगणारे 54 तराफे, 50 ब्रास रेती, एक ट्रॅक्टर व ट्रॉली असा एकूण 66 लाख 50 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. त्यातील 54 तराफे व 4 इंजन जाळुन नष्ट करण्यात आले असुन या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलिसांनी नितीन मोरे, संतुक उर्फ योगेश मोरे रेती उपसा करणारे मालकाविरुद्ध गुन्हा दाखल (Filed a Case) करण्यात आला आहे.