जयंतीनिमित्त लालमाती ते पोलीस स्टेशन पर्यंत मॅरेथॉन वॉक रेसचे आयोजन!
मानोरा (Sardar Vallabhbhai Patel) : पोलीस स्टेशन मानोरा अंतर्गत शहरात पोलीस अधीक्षक अनुतारे यांच्या आदेशाने लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल (Sardar Vallabhbhai Patel) यांची १५० वी जयंती उत्सव उत्साहात साजरी करून जयंतीनिमित्त पोलीस विभागाच्या वतीने लाल माती मानोरा ते पोलीस स्टेशन मानोरा पर्यंत करण्यात मॅरेथॉन वॉक रेसचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मॅरेथॉन रेसमध्ये सहभागी झालेल्या मौजे आमगव्हाण येथील विद्यार्थिनीला दोन शूज जोडाची भेट पोलीस विभागात मार्फत देण्यात म्हणून देण्यात आली.
मासुपा महाविद्यालयाचे एनएसएसचे विद्यार्थी सहभागी!
नमूद वॉक मॅरेथॉनमध्ये पोलीस स्टेशन मानोरा येथील अधिकारी व अंमलदार तसेच सुभद्राबाई पाटील विद्यालयाचे एनएसएसचे विद्यार्थी, पोलीस पाटील, होमगार्ड सैनिक, पोलीस भरती सराव करणारी मुले व सेवानिवृत्त सैनिक अशा प्रकारे एकूण 350 ते 400 व्यक्तींनी मॅरेथॉनमध्ये सहभाग नोंदवला होता. प्रारंभ लाल माती मानोरा येथे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून पूजा चर्चा करण्यात आली व उपस्थित यांना आजच्या दिवसाचे महत्त्व समजून सांगितले व मार्गदर्शन केले. यामुळे प्रमुख पाहुणे म्हणून भारत भारतीय सैनिक (सेवानिवृत्त) सोळंके हे उपस्थित होते. पोलीस निरीक्षक नैना पोहेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मॅरेथॉन वॉकिंग सुरुवातीस लाल माती मानोरा येथे ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते, त्यांनी लांब मार्ग असल्याने उपस्थिती दर्शविली. त्यानंतर वॉक मॅरेथॉन प्रारंभ 07 . 45 वाजता करण्यात येऊन लाल माती मानोरा ते छत्रपती शिवाजी महाराज चौक दिग्रस चौक व पोलीस स्टेशन या मार्गाने करण्यात आला. पो स्टे मानोरा येथे पोहोचल्यानंतर मॅरेथॉनमध्ये सहभागी यांना फळांचे व पाण्याची वाटप करण्यात आले व सर्वांना कार्यक्रमात सहभागी झाल्याबाबत शुभेच्छा देण्यात आल्यात. याप्रकारे कार्यक्रमाचा समारोप रात्री ८.४५ वाजता करण्यात आला. यावेळी मॅरेथॉन वाक रॅलीत सहभागी एका पायात शूज नसलेल्या आमगव्हाण येथील विद्यार्थिनीला पोलीस विभागातर्फे दोन शूज जोडे भेट म्हणून देण्यात आले. या मॅरेथॉन वॉक रेसमध्ये पोलीस अधिकारी, कर्मचारी सुध्दा सहभागी झाले होते.




 
			 
		

