योजनेचे लोकार्पण, वसमत शहराला पाणी पुरवठा झाला सुरू
वसमत (Water Supply Yojana) : वसमत शहरातील बंद पडलेली सतीपांगरा पाणीपुरवठा योजना पुन्हा एकदा सुरू करण्यात आली आहे आमदार राजूपाटील नवघरे यांनी या योजनेसाठी अडीचकोटी रुपयांचा निधी दिला त्यातून बंद पडलेली योजना पुन्हा योजना सुरू झाली. शुक्रवारी या योजनेचा लोकार्पण सोहळा पार पडला यातून आता वसमत चा पाणी प्रश्न कायमचा निकाली निघाला आहे त्यामुळे वसमत मध्ये समाधानाचे वातावरण आहे.
वसमत मध्ये वाढीव पाणीपुरवठा योजना सुरू होण्यापूर्वी सतीपांगरा पाणीपुरवठा योजनेवर वसमत शहराचा पाणीपुरवठा अवलंबून होता. या पाणीपुरवठा योजनेत सतीपांगरा येथे तलावातून शहराला दोन वेळेस भरपूर पाणीपुरवठा होत असे नवीन पाणीपुरवठा योजना सुरू झाल्यानंतर जुनी पाणीपुरवठा योजना अडगळीत पडली बंद पडली.
वाढीव पाणीपुरवठा योजना 62 कोटी रुपयांची झाली सिद्धेश्वर पासून वसमत पर्यंत पाईपलाईनने पाणीपुरवठा सुरू झाला योजना सुरू झाल्यानंतरही वसमत शहराला पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता सिद्धेश्वर वरील वीज पुरवठा खंडित होणे पाईपलाईन वारंवार फुटणे यातून दुरुस्ती व तांत्रिक कामामुळे पंधरा-पंधरा दिवस शहराला निर्जळी घडत होती त्यातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त व्हायच्या पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी मुख्याधिकारी यांना फक्त पाईपलाईन दुरुस्ती करणे एवढेच काम राहिले होते एका ठिकाणी पाईपलाईन दुरुस्ती केली.
तर दुसऱ्या ठिकाणी फुटायची असा हा क्रम सुरू आहे त्यातून पुन्हा कमी दाबाने विद्युत पुरवठा ही समस्या कायम आहे यातून मार्ग निघत नाही वसमतची पाणीटंचाई दूर होत नाही त्यामुळे यावर रामबाण इलाज म्हणून आमदार राजू पाटील नवघरे यांनी बंद पडलेली सती पांगरा पाणीपुरवठा योजना पूर्ववत सुरू करण्याचा निर्धार केला त्यासाठी अडीच कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला त्यातून सती पांगरा तलावाचे दुरुस्ती मशनरी व पाईपलाईन इतर कामे झाली व अक्षरशः बंद पडलेली योजना पुन्हा सुरू झाली आहे या योजनेचा लोकार्पण सोहळा शुक्रवारी पार पडला या कार्यक्रमासाठी आमदार राजू पाटील नवघरे माजी नगराध्यक्ष शिवदास बोड्डेवार मुख्याधिकारी निलेश सुंकेवार सभापती तानाजी पाटील बेंडे ॲड चंद्रकांत देवणे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी माजी नगराध्यक्ष शिवदास बोड्डेवार यांनी आजपर्यंत झालेल्याआमदारांना जमले नाही ते एकट्या राजूभैयांनी करून दाखवले एवढा विकास एकट्या राजू भैयांनी केला असल्याचे त्यांनी सांगितले वसमतच्या इतिहासात एवढा विकास निधी कधीही मिळाला नाही या विकास निधीमुळे वसमत शहराचा कायापालट झाला असल्याचे त्यांनी सांगितले मुख्याधिकारी निलेश सुंकेवार, ॲड चंद्रकांत देवणे यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. यावेळी बोलताना आमदार राजू पाटील नवघरे यांनी वसमत शहरासाठी कधीच पाणी कमी पडू देणार नाही असा शब्द दिला होता तो शब्द मी पूर्ण केला असल्याचे सांगून यापुढेही शहराच्या विकासासाठी निधी कमी पडणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे संचलन सुभाष कदम यांनी केले.




