पुसद (Pusad) :- पुसद सह ग्रामीण भागातील सर्व शाळांमध्ये विद्यार्थी, विद्यार्थिनी व शाळकरी मुले घेण्याकरिता ऑटो रिक्षा (auto rickshaw) वाहन याद्वारे शाळेमध्ये पालक पाठवत असतात. मात्र कुठलीही सुरक्षा नसलेल्या वाहनांमध्ये विद्यार्थी विद्यार्थिनी व लहान मुले अशा भरधाव वेगाने नेणाऱ्या ऑटो मध्ये रोज नेल्या जात आहेत. तर नामांकित शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या वाहनांमध्ये राज्य परिवहन(state transport) अधिकाऱ्यांच्या नियमानुसार कुठलेही सुरक्षेचे नियम पाळला जात नाहीत हे अत्यंत खेदजनक आहे.
राज्य परिवहन अधिकाऱ्यांच्या नियमानुसार कुठलेही सुरक्षेचे नियम पाळला जात नाहीत
अनेक शाळांच्या संचालकांनी याबाबत मौन बाळगलेल्या दिसत आहे, मात्र पुसद पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी आवटे मॅडम यांच्यासह जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक पियुष जगताप, शहर ठाणेदार उमेश बेसलकर, वसंत नगर पोलीस स्टेशनचे(Police Station) ठाणेदार सतीश जाधव, ग्रामीण पोलीस स्टेशनचे प्रभारी ठाणदार सतीश राऊत, यांच्यासह तहसीलदार महादेवराव जोरवर, एस डी ओ आशिष बिजवल यांनी आता तरी गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.




