शालेय साहित्य देऊन भरभरून स्वागत!
कोरेगाव, चोप (School Entrance Festival) : देसाईगंज तालूक्यातील विसोरा येथिल जिल्हा परिषद कन्या प्राथमिक शाळा, विसोरा (Zilla Parishad Girls Primary School) येथे शाळा प्रवेश उत्सव उत्साहात व पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. नव्याने पहिल्या वर्गात प्रवेश घेतलेल्या चिमुकल्या विद्यार्थिनींचे पुष्पगुच्छ, मुकुट, पायातील पाऊलखुणा व शालेय साहित्य देऊन भरभरून स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाच्या शेवटी शाळेच्या परिसरात वृक्षारोपण!
या कार्यक्रमात गावातील भजन मंडळी, लेझीम पथक, तसेच सजवलेली बैलबंडी व ट्रॅक्टर यांच्या माध्यमातून विद्यार्थिनींची भव्य मिरवणूक (Grand Procession) काढण्यात आली. पारंपरिक वाद्यांच्या गजरात गावातून विद्यार्थिनींची स्वागतयात्रा निघाल्याने संपूर्ण विसोरा गावात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते. या विशेष प्रसंगी आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम (MLA Ramdas Masram) सर उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थिनींना प्रेमपूर्वक शुभेच्छा देत शिक्षणाच्या महत्त्वावर प्रकाश टाकला. ‘मुलींचे शिक्षण म्हणजे कुटुंबाचा, गावाचा आणि समाजाचा विकास,’ असे सांगत त्यांनी शाळेच्या विकासासाठी आवश्यक सहकार्य देण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमाच्या शेवटी शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरण संरक्षणाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमात आमदार मसराम यांनी स्वतः सहभाग घेतला.
शिक्षकवर्ग, पालक, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित!
नाना नाकाडे माजी सभापती, परसराम टिकले माजी सभापती, रमेश कुथे सरपंच, नरेंद्रकुमार कोकोडे गटशिक्षणाधिकारी, संजय करांकर, प्रमोद बुध्दे ग्रा. प सदस्य, शाळेचे मुख्याध्यापक मा.धनपाल मिसार, मनोज अवसरे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, सौ. स्वाती फाये उपाध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती, मा रामजी धोटे सर, महेंद्र देशमुख ग्रामपंचायत अधिकारी, मोरेश्वर मोहुर्ले, सागर वाढई, जावेद शेख, स्वप्निल मिसार, गौरव शिलार तसेच शिक्षकवर्ग, पालक, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. शाळा प्रवेश उत्सवाचा हा अनोखा उपक्रम विद्यार्थिनींसाठी (Students) एक संस्मरणीय अनुभव ठरला.