हळद संशोधन केंद्राला शालेय विद्यार्थ्यांची भेट
तांत्रिक माहिती जाणून घेताना विद्यार्थ्यांमध्ये कुतूहलता
हिंगोली (Turmeric Research Centre) : मा. बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्र, वसमत येथे राजर्षी इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी शेतीविषयक अभ्यास दौरा करत, प्रक्षेत्रावर लागवड केलेल्या विविध (Turmeric Research Centre) हळद वाण लागवडीची माहिती घेत. प्रक्रिया उद्योगातून हळदीपासून बनवणाऱ्या विविध पदार्थांची दैनंदिन जीवनातील उपयुक्तता जाणून घेत असताना विद्यार्थ्यांमध्ये कुतूहलता दिसून आली.
मा. बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन केंद्र वसमत येथे शहरातील राजर्षी इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी 25 ऑगस्ट रोजी कृषी विषयक माहिती घेण्यासाठी, प्रक्षेत्रावर भेट दिली. यादरम्यान हळद पिकाविषयी पायाभूत माहिती, लागवड करण्यात आलेल्या शुद्ध हळद बेणे व रोपे पासून लागवड केलेल्या हळद पिक व करावयाचे व्यवस्थापन यासंदर्भातील संपूर्ण माहिती प्रश्न विचारून जाणून घेतली.
तसेच प्रो ट्रे पद्धतीने (Turmeric Research Centre) हळदीची रोपे व त्याची लागवड करणे, हळदीपासून विविध पदार्थाची निर्मिती इत्यादी बाबतची माहिती संशोधन केंद्राचे तंत्र अधिकारी रमेश देशमुख यांनी अगदी सोप्या भाषेत विद्यार्थ्यांना दिली. कृषी अधिकारी शिवाजी राचेवाड, कृषी पर्यवेक्षक रमाकांत भुरे, तंत्र सहाय्यक पंकज कदम यांनी ही हळद व प्रक्षेत्रावर शेतकऱ्यांसाठी उभारण्यात येणाऱ्या विविध सोयी सुविधा संबंधित सांगितले. सद्यस्थितीला मशिनरीद्वारे होत असलेल्या कामांची माहिती अभियंता रूपेश गायकवाड यांनी सोप्या भाषेत दिली. ही सर्व माहिती विद्यार्थी ऐकत असताना त्यांच्यामध्ये कुतूहलता दिसून आली.
यावेळी महेश आमदुरे, शाळेचे संचालक रमेश पडोळे, सहशिक्षक गजानन बोखारे, जगन्नाथ बोखारे, नम्रता दारेवार, मीनाक्षी मॅडम, मारुती देवगडे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गजानन बोखारे तर आभार जगन्नाथ बोखारे यांनी मानले.