भारत सातपुते यांची आतापर्यंत 60 पुस्तके प्रकाशित!
लातूर (Senior Literary) : साहित्याच्या साधारण सर्व प्रकारात लेखन करणारे ज्येष्ठ साहित्यिक, वात्रटिकाकार, कवी भारत सातपुते (Poet Bharat Satpute) यांनी पुरस्कारांचे नुकतेच शतक ओलांडले आहे. लातूर तालुक्यातील गातेगावचे सुपुत्र भारत सातपुते यांनी चाळीस वर्षांपूर्वी आपल्या लेखनाला कवितांच्या माध्यमातून सुरुवात केली. 1985 साली ‘जगणं माणसाचं’ हा पहिला काव्यसंग्रह नाशिकच्या दवबिंदू प्रकाशनाने प्रकाशित केला.
‘या’ नावाने विविध लेखकांनी संपादित केलेली पुस्तके प्रकाशित!
आता वयाची त्रेसष्टी पार करताना भारत सातपुते यांची संख्यात्मक दृष्टीने पाच डझन पुस्तके प्रकाशित (Publish Books) झाले आहेत. ज्यामध्ये 12 काव्यसंग्रह, 10 वात्रटीकासंग्रह, 8 कथासंग्रह, 6 बालसाहित्य, 6 व्यक्तीचरित्र व इतर 8 साहित्यात नाटिका, शैक्षणिक, वैचारिक, ऑडिओ कॅसेट प्रसिद्ध झाले आहे. तर भारत सातपुते यांच्या शैक्षणिक व साहित्यिक प्रवासावर 6 पुस्तके लिहिली असून ज्यात शिक्षण क्षेत्रातील सिंघम, पुरचुंडी, मुलाखत एका साहित्यिकाची, भारतनामा, तसेच सातपुते यांच्या निवडक कविता, निवडक वात्रटीका, निवडक कथा यांचेही द्या टाळी, तळमळ, अवं कवातरी चांदणं दिसल, या नावाने विविध लेखकांनी संपादित केलेली पुस्तके प्रकाशित झाली आहेत. भारत सातपुते यांच्या अनेक मराठी कवितांचा इंग्रजी व हिंदी भाषेत अनुवादही झालेला आहे.
उर्वरित साहित्यिक कार्याबद्दल पुरस्कार लाभले!
पंधरा वर्षांपूर्वी मकरंद अनासपुरे यांची भूमिका असलेल्या पुण्याच्या ‘यशदा’ तर्फे ‘विद्या आली दारोदारी’ हा लघुचित्रपटही प्रदर्शित झाला असून, या चित्रपटात भारत सातपुते यांची कथा व गाणी आहेत. भारत सातपुते यांच्या शैक्षणीक व या वांग्मयीन प्रवासाबद्दल त्यांना राज्य व केंद्र शासनासह (State and Central Govt) अनेक सेवाभावी, सामाजिक व साहित्यिक संस्थांकडून सतत सन्मान होत असून नुकतेच त्यांनी पुरस्कारांचे शतक (Award Century) ओलांडले आहे. मिळालेल्या पुरस्कारांत मराठवाडा 35, विदर्भ 8, पुणे-मुंबई 13, पश्चिम महाराष्ट्र कोकण 15, तर परराज्यातून म्हणजे दिल्ली, मध्यप्रदेश, गुजरात, कर्नाटक इथूनही मिळालेल्या पुरस्कारांसह एकुण संख्या आता 100 पेक्षा जास्त झाली आहे. यात शैक्षणिक कामाबद्दल 25 तर उर्वरित साहित्यिक कार्याबद्दल पुरस्कार लाभले आहेत.