परभणी(Parbhani):- शेर – ए – पंजाब शाही इमाम मौलाना उस्मान रहेमानी लुधियानवी हे २६ जानेवारी रोजी परभणी दौर्यावर येत आहेत. या निमित्त अलखैर फाउंडेशन यांच्या वतीने दोन विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
दोन वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन
रविवारी सकाळी दहा वाजता धार रोडवरील इफ्तेखार पार्क येथे उलेमा, वकिल, शिक्षक आणि इतर बुध्दीजीविंसाठी विशेष बैठक बोलावण्यात आली आहे. दुसरा कार्यक्रम जिंतूर रोडवरील ईदगाह मैदानावर सायंकाळी सात वाजता होईल. या कार्यक्रमात वक्फ आणि लोकशाहीचे संरक्षण या विषयावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. कार्यक्रमास मौलाना कलंदर खान नदवी, मौलाना शेख शाहिद अशरफी, मुफ्ती मोहम्मद सईद अनवर कासमी यांची उपस्थिती राहिल. कार्यक्रमाचा (Programs) लाभ घ्यावा, असे आवाहन मुफ्ती शेख तलहा आशरफी, मुफ्ती शेख साजीद नदवी आणि अलखैर फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले.