Narendra Modi and Sharad Pawar:- राष्ट्रवादी-एससीपीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी बुधवारी संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi )यांची भेट घेतली. यावेळी पवारांनी पंतप्रधान मोदींशी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा केली. मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी-एससीपीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सातारा आणि फलटण येथील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांना डाळिंब भेट दिले. या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे शरद पवार यांनी ठणकावून सांगितले.
#WATCH | Delhi: NCP-SCP chief Sharad Pawar met PM Narendra Modi today in the Parliament regarding pomegranate issue of farmers.
Visuals as he leaves from the Parliament. pic.twitter.com/5diMYHVCno
— ANI (@ANI) December 18, 2024
नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाषणबाजीत तणावाचे वातावरण असताना पंतप्रधान मोदींसोबत शरद पवार यांची ही भेट झाली. या निवडणुकीत महाविकास आघाडीला दारूण पराभवाला सामोरे जावे लागले.