मंगरूळपीर तालुक्यातील घटना
मंगरूळपीर (Shelubazar Crime) : मंगरूळपीर तालुक्यातील शेलुबाजार येथे वार्ड क्र. 2 मध्ये राहणाऱ्या इसमाच्या घरी एक धारदार तलवार आढळून आली याप्रकरणी पोलिसांनी दोघाविरुद्ध दिनांक.27 ऑगस्ट रोजी विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि.२७/ ऑगस्ट रोजी गुप्त बातमीदारा कडुन माहीती मिळाली की, वार्ड क्रमांक २ शेलू बाजार येथे एका इसमाच्या राहते घरात पलंगाचे गादीखाली एक धारदार तलवार असल्याची गोपनिय माहीती मिळाल्यावरून पोलीस निरीक्षक किशोर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ रन्नू रायलीवाले, पोकॉ शकील मुन्नीवाले, हे घटनास्थळी रवाना होवुन अमीरशहा जमीरशहा, शेख सलीम शेख यासीन यांचे राहते घराची पंचा समक्ष अवैध हत्यारा बाबत घराची झडती घेतली असता घरातील पलंगाचे गादीखाली एक धारदार तलवार पंचा समक्ष निरीक्षण केले.
तलवारीची लांबी ३५.५ इंच असुन त्याची रुंदी १.५ इंच आहे नमुद आरोपीतांना ताब्यात घेवुन एक तलवार किंमत २०००/-रू. ची जप्त करून व आरोपी नामे अमीरशहा जमीरशहा वय २५ वर्ष रा. वार्ड क्रमांक २ शेलू बाजार ता. मंगरूळपीर, शेख सलीम शेख यासीन, वय २८ वर्ष रा. कुंभारी ता.जि. अकोला, याचे कृत्य कलम ४.२५ आर्म अॅक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करून तपासात घेतला. सदर गुन्हयाचा तपास पोलीस निरीक्षक किशोर हि. शेळके यांचे मार्गदर्शनाखाली पोहेकॉ रन्नू रायलीवाले हे करीत आहे.