कळमनुरी(Hingoli) :- हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील ईसापुर जलाशयातून शेनोडी – रामवाडी तालुका कळमनुरी उपसा सिंचन योजना राबविण्या बाबत कार्यकारी अभियंता उर्ध्व पैनगंगा प्रकल्प विभाग क्रमांक चार आखाडा बाळापूर यांनी समितीला दिनांक २४ सप्टेंबर २०२४ रोजी पत्र देऊन बेमुदत उपोषण स्थगित करताना या योजनेच्या प्रशासकीय मान्यतेसाठी आवश्यक असलेले अंदाजपत्रके व नकाशे तयार करण्या करता सल्लागाराची नेमणूक करण्या येणार असून याकरिता निविदा बोलावण्यात येणार आहे. त्याकरता चे अंदाजपत्रक तयार करून निविदा बोलावून बोलावण्यात येणार होत्या. परंतु आजपर्यंत हि यात कोणती प्रगती संबंधित कार्यालयाने केलेली नसल्यामुळे पाणी हक्क संघर्ष समितीने जलसंपदा विभागाच्या (Department of Water Resources) प्रधान सचिवांना मा. उपविभागीय अधिकारी कळमनुरी सौ. प्रतीक्षा भूते यांच्या मार्फत निवेदन देऊन 3 मार्च पर्यंत सदरचे काम पूर्ण झाल्यास आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
3 मार्च पर्यंत सदरचे काम पूर्ण झाल्यास आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा
कार्यकारी संचालक, गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ, छत्रपती संभाजीनगर यांनी मा. अप्पर मुख्य सचिव , जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई यांना दिं. 26 / 6 /2024 रोजी प्रस्ताव पाठवलेला आहे. सदर प्रस्तावास प्रशासकीय मान्यता देण्यात यावी. या मागणीसाठी अनेक आंदोलने करण्यात आलेली आहेत. ईसापुर धरणाच्या जलाशयातून हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्याच्या शेनोडी या गावापासून शेनोडी – रामवाडी ही उपसा सिंचन योजना प्रस्तावित केलेली आहे,( 8. 87) दलघमी पैकी 4.92 दलघमी ( 8. 87- 3.95 ) दलघमी व धर्माबाद शाखा कालव्याच्या अंतर्गत शहरीकरणामुळे वितरीकांचे एकूण 854.0 हे. लाभ क्षेत्र वगळल्यामुळे उपलब्ध होणारे 6.33 दलघमी पाणी असे एकूण 11.25 दलघमी (4.92+ 6.33) पाणी प्रस्तावित शेनोडी- रामवाडी तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली उपसा सिंचन योजना करता 1958 हे. क्षेत्र सिंचलाखाली येणार असल्याचा हा प्रस्ताव आहे. या प्रस्तावास हिंगोली जिल्ह्याच्या सिंचन अनुशेषांतर्गत विशेष बाब म्हणून समावेश करून मान्यता देण्यात यावी अशी मागणी गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने होत आहे.
संघर्ष समिती तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार असल्याची माहिती
पाणी हक्क संघर्ष समितीने याकरता मोठमोठाली आंदोलन करूनही संबंधित विभाग चाल ढकल करीत आहे तर दुसरीकडे हिंगोली जिल्ह्यातील पाणी अनेक योजनांसाठी नांदेड जिल्ह्याकडे पळविण्याचा कार्यक्रम बिनबोभाट चालू आहे, त्यातच आता खरबी गावाजवळ कयाधू नदीवर बांधारा बांधून त्याचे पाणी पण ईसापुर धरणाच्या माध्यमातून नांदेडला नेण्याचा सोपस्कार पूर्ण झालेले आहेत. परंतु कळमनुरीकर हक्काचे पाणी मागत असताना व पाणी उपलब्ध असताना पण पाणी मिळत नाही, यामुळे आता संघर्ष समिती तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार असल्याचे माहिती पाणी हक्क संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आली असून सदर निवेदनाच्या प्रती लोकप्रतिनिधीसह सर्व संबंधितांना देण्यात आलेल्या आहेत. निवेदनावर नंदकिशोर तोष्णीवाल मसोडच्या सरपंच पुष्पा उत्तम कुरवडे, रामवाडीचे सरपंच प्रभू भागोराव टाले, मुंढळचे सरपंच राणी कानबाराव मस्के , असोलवाडीचे सरपंच उषा अशोक भोजले , डॉक्टर एल डी कदम, भारत बोडखे , उत्तम कुरवडे , माधव टाले , राजू मस्के , महमंद परवेज संजय डोंगरे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.