माजी पं.स. सभापती व माजी नगराध्यक्षा सह अनेकांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश
कळमनुरी (Shinde Shiv Sena) : तालुक्यात काँग्रेसचे नेतृत्व भरकटल्याने कळमनुरी नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा, पंचायत समितीच्या माजी सभापती यांच्यासह अनेक माजी नगरसेवक, काँग्रेस कार्यकर्ते व इतर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकत आमदार संतोष बांगर यांच्या हस्ते शिवसेनेत २१ ऑगस्ट रोजी जाहीर प्रवेश केला.
मागील काही दिवसांपासून कळमनुरी तालुक्यात काँग्रेस पक्षाला गळती लागली असून काँग्रेसच्या अनेक बड्या नेत्यांनी, पदाधिकार्यांनी काँग्रेस पक्षाला राम राम ठोकला आहे. २१ ऑगस्ट रोजी हिंगोली शिवसेना जिल्हाप्रमुख तथा कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत काँग्रेसच्या माजी नगराध्यक्षा सौ सुवर्णा गाभणे, प्रा.आनंदराव पारडकर,माजी नगरसेवक अरुण वाढवे, पंचायत समितीच्या माजी सभापती सौ.अनिता खुडे, माजी नगरसेवक देवराव बुरकुले, रणवीर ताई, बबनराव खुडे, संदीप गाभणे, उबाठा चे मुखिद आश्रफी, भाजपचे साजिद, गणेश धाबे, जब्बार, संभाजी देशमाने, विश्वजित गाभणे, प्रशांत वानखेडे, डॉ. आश्लेष गाभणे तसेच सांडस येथील भास्कर राव बलखंडे, मनोज भडंगे, शेख पाशु शेख अलीम, कैलास निरगुडे, शेख नाजीम शेख हुसेन, सचिन जाधव, ज्ञानेश्वर बलखंडे, धम्मपाल बलखंडे, भिलरत्न बलखंडे व इतर अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी (Shinde Shiv Sena) शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. ऐन स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसच्या पदाधिकार्यांनी पक्षांतर केल्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे.
कळमनुरीत काँग्रेसने विरोधकांना दिले अनेक मातब्बर कार्यकर्ते
अलिकडच्या काळात काँग्रेस पक्षातील अनेक कार्यकर्ते विरोधकांना मिळाले आहेत. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष असतांनाच संजय बोंढारे यांनी पक्ष सोडून शिवसेनेत प्रवेश घेतला होता. काही महिन्यांपूर्वी याच जिल्हाध्यक्ष पदावरून राजीनामा देऊन दिलीप देसाई यांनी भाजपची वाट धरली. काँग्रेसचे आमदार राहीलेले डॉ. संतोष टारफे सध्या शिवसेना उबाठा गटात आहेत. यापूर्वी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष असलेले माजी खासदार अॅड. शिवाजी माने काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदावरूनच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले होते.
कधीकाळी काँग्रेस पक्षाचे देशाचे नेतृत्व दिवंगत खासदार राजीव सातवांमुळे कळमनुरीकडे होते. आजही जिल्ह्यातील तिनही विधानसभा विरोधकांकडे असतांना विधान परिषदेची आमदारकी कळमनुरीच्या डॉ. प्रज्ञा सातवांकडे आहे. या (Shinde Shiv Sena) आमदारकीचाही कार्यकर्त्यांना विश्वास देण्यास पक्षाला काहीच उपयोग झाला नाही.