परभणी (Shiv Jayanti) : येथील जिल्हा रुग्णालयात दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती महोत्सव (Shiv Jayanti) अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सदानंद भिसे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागेश लखमावार, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सारिका बडे, डॉ.कल्याण कदम, डॉ.अमोल भालेराव, डॉ. नरेंद वर्मा, डॉ.अशोक बन, डॉ. राम रोडगे, डॉ. सुनील मोर , डॉ.सचिन गरुड, डॉ.जयश्री यादव, डॉ. शेकर, मेट्रन मीनाक्षी सूर्यवंशी, मीना देशमुख, राजा लखमावार, मुकादम राजू डीलोड समवेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय येथील सर्व अधिकारी, नर्सिंग स्टाफ,सर्व कर्मचारी, सर्व मेडिकल स्टुडेंट्स आणि नर्सिंग स्टुडेंट्स उपस्थित होते.
यावेळी शिवजन्म उत्सवावर आधारित पथनाट्य,सजीव देखावा, पोवाडे, नृत्य सादर करण्यात आले. तसेच विविध खेळात प्रथम ते तृतीय क्रमांक पटकावलेल्या सर्वांना बक्षीस देण्यात आले. यावेळी कार्यक्रमांचे मुख्य आकर्षण म्हणजे (Shiv Jayanti) छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्म आणि पराक्रम याबाबत सजीव देखावा, त्यांचे विषयी जीवन विषयक मुक नाटक व इतर सजीव देखावा सादर करण्यात आला होता.