छत्रपतींचे लोककल्याणकारी प्रशासन आजही आदर्श- आ. गायकवाड
बुलडाणा (Shiv Rajyabhishek) : शौर्य, स्वाभिमान आणि स्वराज्याचे प्रतीक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५२ व्या (Shiv Rajyabhishek) शिवराज्याभिषेक दिनानिमित्त बुलडाणा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार संजय गायकवाड (MLA Sanjay Gaikwad) यांना यावर्षी शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यात पालखीचे मानकरी होण्याचा मान मिळाला. छत्रपती संभाजीराजे भोसले (Chhatrapati Sambhaji Raje Bhosale) यांच्या उपस्थितीत छत्रपतीं शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या पवित्र समाधीचे त्यांनी दर्शन घेतले.
रायगड किल्ला म्हणजे स्वराज्याची राजधानी आणि मराठी मनाचे श्रद्धास्थान आहे. रायगडावर ६ जून रोजी दरवर्षी मोठ्या उत्साहात (Shiv Rajyabhishek) शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात येतो. त्या अनुषंगाने यंदाही रायगडावर या ३५२ व्या सोहळयाचे आयोजन करण्यात आले. या सोहळयाला राज्यभरातून आलेल्या हजारो शिवप्रेमींमध्ये आ. गायकवाड (MLA Sanjay Gaikwad) यांनीही उपस्थित राहून अभिवादन केले. त्यांनी छत्रपती शिवरायांच्या समाधीस्थळी पुष्पहार अर्पण करून नतमस्तक होत महाराजांना वंदन केले. यावेळी (Chhatrapati Shivaji Maharaj( ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.
यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना आमदार संजय गायकवाड (MLA Sanjay Gaikwad) म्हणाले, शिवराज्याभिषेक दिन (Shiv Rajyabhishek) हा फक्त एक ऐतिहासिक घटना नसून, तो आत्मभान, शिस्त, आणि नेतृत्वगुणांची आठवण करून देणारा पवित्र दिवस आहे. छत्रपतींच्या पावलावर पाऊल ठेवत कार्य करण्याचा निर्धार आमदारांनी व्यक्त करत म्हणाले की, “छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) हे आमच्या जीवनातील प्रेरणास्थान आहेत. त्यांनी स्थापलेले हिंदवी स्वराज्य आणि दिलेले लोककल्याणकारी प्रशासन आजही आदर्श ठरते. त्यांच्या विचारांनी चालणे, हेच खरे त्यांना अभिवादन आहे. राज्यघटना, लोकशाही आणि स्वाभिमानासाठी त्यांनी दिलेला लढा आम्हाला आजही दिशा दाखवतो.”
यावेळी त्यांच्या सोबत शिवसैनिक, समर्थक, व ऐतिहासिक वारसा जपणाऱ्या संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
छत्रपतींची घेतली भेट..
दरम्यान या उत्सव सोहळयात सहभागी झालेले युवराज छत्रपती संभाजीराजे भोसले (Chhatrapati Sambhaji Raje Bhosale) यांची भेट देखील आ. संजुभाऊ गायकवाड यांनी घेतली. यावेळी दोघात विविध विषयावर चर्चा झाली. आ. गायकवाड (MLA Sanjay Gaikwad) यांनी छत्रपती संभाजीराजे भोसले यांना बुलडाण्यात पुढच्यावर्षी होणाऱ्या उत्सव समारंभात उपस्थित राहण्याचे आमंत्रणही दिले.