देशोन्नतीदेशोन्नतीदेशोन्नती
Notification Show More
Font ResizerAa
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
      • नागपूर
      • अकोला
      • अमरावती
      • चंद्रपूर
      • यवतमाळ
      • वर्धा
      • बुलडाणा
      • गोंदिया
      • गडचिरोली
      • वाशिम
      • भंडारा
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • लातूर
      • नांदेड
      • हिंगोली
      • बीड
      • परभणी
      • जालना
    • उत्त्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • नंदुरबार
      • जळगाव
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Reading: Shiv Sena: पराभवाने खचून जाईल तो शिवसैनिक कसला: खा. अरविंद सावंत
Share
Font ResizerAa
देशोन्नतीदेशोन्नती
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Search
  • होम
  • महाराष्ट्र
  • देश
  • विदेश
  • आपले शहर
    • मुंबई
    • पुणे
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्त्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • प्रहार
    • लेख
  • राजकारण
  • मनस्विनी
  • मनोरंजन
  • बिझनेस
    • शेअरबाजार
    • शेती (बाजारभाव)
  • अध्यात्म
  • करीअर
  • तंत्रज्ञान
  • क्रीडा
  • क्राईम जगत
  • आरोग्य
  • शेती
  • फिरस्ता
Have an existing account? Sign In
Follow US
देशोन्नती > आपले शहर > विदर्भ > बुलडाणा > Shiv Sena: पराभवाने खचून जाईल तो शिवसैनिक कसला: खा. अरविंद सावंत
विदर्भबुलडाणामहाराष्ट्रराजकारण

Shiv Sena: पराभवाने खचून जाईल तो शिवसैनिक कसला: खा. अरविंद सावंत

Deshonnati Digital
Last updated: 2024/06/20 at 6:26 PM
By Deshonnati Digital Published June 20, 2024
Share
Shiv Sena

आता उठवू सारे रान, आता पेटवू सारे रान

बुलढाणा (Shiv Sena) : ४०० पार चा नारा देणारे २४० वर आले आहेत, राज्यात २३ चे ९ झाले आहेत. (Shiv Sena) शिवसेना आणि ठाकरे या नावाशिवाय राज्यात काहीही होऊ शकत नाही. शिवसैनिक हा छातीवर वार घेणार आहे, पाठीवर वार करणारा नाही. निवडणुका येतील-जातील. एका पराभवाने खचून जाईल तो शिवसैनिक कसला ? त्यामुळे हिम्मत हरू नका. येणाऱ्या विधानसभा निवडणुकी स्वाभिमानाचा आणि निष्ठेचा भगवा फडकवण्यासाठी तयार व्हा, असे आवाहन पश्चिम विदर्भ संपर्कप्रमुख तथा शिवसेना नेते खासदार (Arvind Sawant) अरविंद सावंत यांनी केले.

सारांश
आता उठवू सारे रान, आता पेटवू सारे रानशिवसेनेचा (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पदाधिकारी मेळावा उत्साहातलोकहिताचा लढा कायम ठेवू: नरेंद्र खेडेकरबुलढाणा विधानसभेवर निष्ठेचा भगवा फडकणारच :जालिंदर बुधवत

शिवसेनेचा (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पदाधिकारी मेळावा उत्साहात

बुलढाणा येथील गर्दे सभागृहात खा.अरविंद सावंत (Arvind Sawant) यांचा सत्कार आणि शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा मेळावा आज गुरुवार २० जून रोजी उत्साहात पार पडला. यावेळी प्रमुख मार्गदर्शन करताना खा. सावंत बोलत होते. ते पुढे म्हणाले, वंदनीय शिवसेनाप्रमुखांनी आपल्याला डोळ्यात डोळे घालून बोलायला शिकवले आहे. प्रा. नरेंद्र खेडेकर यांच्या पराभवाच दुःख आहेच. शेतीसाठी आपण जशी मशागत करतो, पेरणी करतो. त्याचप्रमाणे संघटना वाढण्यासाठी देखील माणूस आणि कार्यकर्ता जोडणीच काम आपल्याला आगामी काळात कराव लागणार आहे. गुजरातमध्ये त्यावेळी घडलेल्या प्रकरणानंतर मोदींना भाजप घरी पाठवणार होती. मात्र केवळ आणि केवळ शिवसेनाप्रमुखांनी मोदींना वाचवलं. त्याच मोदींनी शिवसेना (Shiv Sena) फोडण्याचे काम करणाऱ्या गद्दारांना साथ दिली.

Shiv Sena
महाराष्ट्राने दाखवून दिलं की मोदी ब्रँड आता राहिला नाही. मणिपूर एका बाजूला धगधगत आहे. आर. एस. एस. ला देखील आता उशिरा जाग आली आहे. देशात सगळा मनमानी कारभार चाललाय. परंतु “दोन पलटूराम” सत्तेचे साथीदार झाले आहेत. ते केव्हा पलटी मारतील, हे सांगता येणार नाही. त्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार देखील आगामी काळात पाहायला देशात मिळू शकते. नाहीतर मध्यावधी देखील लागू शकतात. त्यामुळे आपल्याला तयार राहायचं आहे. “उतणार नाही मातणार नाही, घेतला वसा सोडणार नाही..” या विचाराने शिवसैनिकांनी (Shiv Sena) आगामी काळात काम करावं. सध्या राज्यात मराठी माणसं एकमेका विरोधात लढत आहेत. आपल्याला निष्ठेचा आणि स्वाभिमानाचा भगवा विधानसभेवर फडकावयचा आहे. त्यामुळे हिम्मत करू नका. विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने स्वार्थ भावना बाजूला ठेवून त्याग भावनेने एकत्र येऊन काम करा, असे आवाहन देखील याप्रसंगी खा. अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी केले.

लोकहिताचा लढा कायम ठेवू: नरेंद्र खेडेकर

निवडणुकीनंतर पहिल्यांदा मेळाव्याच्या रूपाने सर्वांसमोर आलो आहे. शेती-मातीचे अनेक प्रश्न आहेत. अवकाळीने काही मृत्यू जिल्ह्यात झाले आहेत. अनेक दुःख लोकांना आहेत. निवडणूक हरणे-जिंकणं यात सर्व काही गमावलं-कमावलं, असं म्हणता येणार नाही. आम्ही थोडे कमी पडलो, असं म्हणून यशाचे बाप हजार असतात. अपयश मात्र अनाथ असतं. त्यामुळे अपयश ही माझी वैयक्तिक जबाबदारी म्हणून मी स्वीकारतो असं संपर्कप्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर (Narendra Khedekar) यांनी लोकसभा निवडणुकी सदर्भात बोलताना सांगितलं. विधानसभा असो वा कार्यकर्त्यांच्या येणाऱ्या निवडणूक असतील, आपण हिरहिरीने प्रत्येक बाबतीत लक्ष घालून पुढाकार घेऊ. मतविभाजनाचा फटका आपल्याला बसला. एका पराभवणे आपण खचून जाणारे शिवसैनिक नाहीत. १५ वर्षातले प्रश्न राहिलेत त्यांना सोडवण्यासाठी आपण काम करू असं ते आता म्हणत आहेत. मात्र हे प्रश्न घेऊन आपण लोकांसमोर गेलो होतो. त्यांना आता उशिरा जाग आली, अशी टिका खा. प्रतापराव जाधव यांच्यावर प्रा. नरेंद्र खेडेकर यांनी केली. शिवसेनेचा लोकहितासाठीचा लढा आपण कायम ठेवू, अशी ग्वाही याप्रसंगी नरेंद्र खेडकर (Narendra Khedekar) यांनी दिली.

बुलढाणा विधानसभेवर निष्ठेचा भगवा फडकणारच :जालिंदर बुधवत

सत्ता आणि पैशाच्या जोरावर निवडणुका लढवणाऱ्यांना महाराष्ट्रातील जनतेने चांगली अद्दल घडवली आहे. (Buldhana LokSabha) बुलढाणा येथे लोकसभा निवडणुकीत झालेला पराभव हा कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागणारा असलातरी या पराभवाचा वचपा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आपल्याला काढायचा आहे. बुलढाणा विधानसभेवर आपल्याला निष्ठेचा भगवा फडकवायचाच आहे, असा निर्धार शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांनी व्यक्त केला. ते पुढे म्हणाले, खा. अरविंद सावंत यांचा आपण या ठिकाणी सत्कार करत आहोत. हा केवळ त्यांनी खासदारकी पुन्हा मिळवले म्हणून नाहीतर हा खऱ्याअर्थाने निष्ठेचा सत्कार आहे. जेव्हा ते केंद्रात मंत्री होते. तेव्हा मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी स्वाभिमानाने जगणाऱ्या (Shiv Sena) शिवसेनेचा लढाऊ बाणा दिसावा म्हणून उद्धव साहेबांनी पाठवलेल्या एका निरोपावर केंद्रीय मंत्रीपदाचा पाच मिनिटाच्या आत राजीनामा देऊन माघारी फिरणाऱ्या निष्ठावान सैनिकाचा हा सत्कार आहे.

बुलढाणा (Buldhana LokSabha) जिल्ह्यात शिवसेनेची मशाल धगधगती आहे. ज्या ताकतीने लोकसभा लढलो. त्याच ताकतीने विधानसभा ही लढू. निष्ठावंत माणसाला शिवसेनेत तिकीट मिळू शकते. महाविकास आघाडीचा आणि उद्धव साहेबांचा लढाऊपणा यामुळे तयार झालेला माहोल पाहून तिकिटासाठी अनेक जण आपल्याकडे गर्दी वाढू पाहत होते. विधानसभेच्या दृष्टीने देखील हे चित्र पुढे येणार आहे. पण निष्ठावंताला खऱ्या अर्थाने न्याय हा शिवसेनेतच मिळतो. आपण जर मला उमेदवारी दिली तर बुलढाणा विधानसभेवर शिवसेनेचा निष्ठेचा भगवा फडकवून दाखवूच. मातोश्री जो आदेश येईल त्या आदेशाचे पालन करू व उद्धवसाहेबांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री करण्यासाठी जीवाचे रान करून काम करू, असेही यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांनी सांगितले.

यावेळी मंचावर (Shiv Sena) शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर (Narendra Khedekar), सहसंपर्क प्रमुख दत्ता पाटील, छगन मेहेत्रे, जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, जिल्हाप्रमुख वसंतराव भोजने, महिला आघाडी जिल्हाप्रमुख सौ चंदाताई बढे, जिजाताई राठोड, यांचेसह शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख तालुकाप्रमुख सर्व अंगिकृत संघटनांची प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिद्धेश्वर आंधळे यांनी तर आभार तालुका प्रमुख लखन गाडेकर यांनी मानले.

You Might Also Like

Sant Shri Kashinath Baba: महान तपस्वी संत श्री काशिनाथ बाबा जन्मसोहळा शनिवारला!

District Council Election: गिरोली सर्कलमध्ये आगामी जि. प. निवडणूक होणार चुरशीची!

District Council: भर जहागीर सर्कल मधील आगामी जि.प. उमेदवारी साठी टस्सल!

Wildlife Week: शंकरपूर उपवनक्षेत्रात वन्यजीव सप्ताह उत्साहात!

Adani AI Data Centre: भारतात बनणार सर्वात मोठे AI हब; अदानी आणि गुगलचे सामायिक दृष्टिकोन

TAGGED: Arvind Sawant, Buldhana LokSabha, Lok Sabha Elections, Narendra Khedekar, Prataprao Jadhav, Shiv Sainik, Shiv Sena
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp

Follow US

Find US on Social Medias
0 Like
Twitter Follow
0 Subscribe
Telegram Follow
Popular News
Gangster Bhupendra Singh
क्राईम जगतयवतमाळविदर्भ

Gangster Bhupendra Singh: गँगस्टर भूपेंद्र सिंग उर्फ रघु उर्फ भिंडा कडून इंटरनॅशनल वर्चुअल सिमचा वापर

Deshonnati Digital Deshonnati Digital June 2, 2025
Potholes Road: चिखलमय रस्त्यामुळे नागरिक भोगताहेत मरण यातना; दुरुस्तीसाठी रास्ता रोकोचा इशारा!
Ashish Jaiswal: जिल्ह्यात वनपर्यटन विकसित करा: सहपालकमंत्री अ‍ॅड. आशिष जयस्वाल यांचे निर्देश
Village Carpenter: ‘यामुळे’ लाकडी अवजारे कालबाह्य होण्याच्या मार्गावर; सुतार कारागीरावर उपासमारीची वेळ
Washim : सोयाबीन चोरट्यांना पोलिसांनी केली अटक..
- Advertisement -
Ad imageAd image
Global Coronavirus Cases

Confirmed

0

Death

0

More Information:Covid-19 Statistics

वाचण्यासारखी बातमी

Sant Shri Kashinath Baba
विदर्भवाशिम

Sant Shri Kashinath Baba: महान तपस्वी संत श्री काशिनाथ बाबा जन्मसोहळा शनिवारला!

October 14, 2025
District Council Election
विदर्भवाशिम

District Council Election: गिरोली सर्कलमध्ये आगामी जि. प. निवडणूक होणार चुरशीची!

October 14, 2025
District Council
विदर्भवाशिम

District Council: भर जहागीर सर्कल मधील आगामी जि.प. उमेदवारी साठी टस्सल!

October 14, 2025
Wildlife Week
विदर्भगडचिरोली

Wildlife Week: शंकरपूर उपवनक्षेत्रात वन्यजीव सप्ताह उत्साहात!

October 14, 2025
Show More
देशोन्नतीदेशोन्नती
Follow US
© www.Deshonnati.com. Vidharbha publication Company. All Rights Reserved.
  • About Deshonnati
  • Contact us
  • Terms & Conditions
  • Privacy Policy
Go to mobile version
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?