शाखांचे होऊ लागले नूतनीकरण!
उदगीर (Shiv Sena) : सत्ता आल्यानंतर, पहिल्याच दिवशी शेतकरी बांधवांना 2 लाख रुपयांची कर्ज माफी देणाऱ्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी जनतेने ताकदीने उभे राहावे, असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी यांनी केले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी यांनी शिवसेनेचा झंझावात सुरू केला असून ठीक ठिकाणी शाखा नूतनीकरण व नाम फलकांचे अनावरण केले जात आहे. तालुक्यातील तोंडचिर व शेकापूर येथे शिवसेना शाखा नाम फलकाच्या व शाखा नूतनीकरण प्रसंगी रेड्डी बोलत होते. यावेळी बोलताना रेडी म्हणाले की, भाजपा महायुती सरकारच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात महागाई वाढली आहे. बेरोजगारांच्या हाताला काम नाही. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन या सरकारने (Govt) पाळले नाही. अशा लबाड सरकारला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी जनतेने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी आपली ताकद उभी करावी, असे यावेळी रेड्डी म्हणाले.
कार्यक्रमास उपस्थित!
या कार्यक्रमास शिवसेना जिल्हा समन्वयक प्रकाश हैबतपुरे, तालुका प्रमुख प्रशांत मोरे, उप जिल्हा प्रमुख भरत सांगवीकर, तालुका समन्वयक व्यंकट साबणे, युवासेना तालुका अधिकारी चंद्रकांत सांगळे, उप तालुका प्रमुख महेश फुले, शहर प्रमुख बालाजी सोनाळे, पद्माकर पेंडारकर, अरुण बिरादार, अमोल बिरादार विभाग प्रमुख, सर्कल प्रमुख व्यंकट पाटील, चंद्रशेखर पांचाळ उपस्थित होते. शिवसेना तोंडचीर शाखा प्रमुख म्हणून राहुल जाधव यांची निवड करण्यात आली. तर शेकापूर शाखा प्रमुखपदी संजय सावंत निवड करण्यात आली. तोंडचिर येथे कार्यक्रमास वैभव येगारे, माधव जाधव, व्यंकटेश तरखे, विश्वजित जाधव, श्रीकांत कोळी, विवेक जाधव, विशाल येगारे, व्यंकट सगर, करण जाधव, विठठ्ल आतनुरे, मारोती जाधव, जुने शिवसैनिक: अशोकराव शिंदे, व्यंकटराव सगर, करण जाधव,अशोकराव भद्रे, बालाजी हांदिखेरे, बापूराव कदम, अकाश नरवाड, आकाश जाधव, हंसराज जाधव, आकाश नरवाड, हसंराज जाधव, बालाजी ज्योतीकोळी, गणेश रत्नपारखे, विकास जाधव. संजय सावंत, बालाजी सूर्यवंसी, माधव पाटील, राजेंद्र बुक्के, दयानंद शेळाले, विशाल कोनाळे विजय वाघमारे व ग्रामस्थ, शिवसैनिक (Shiv Sainik) उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन तालुका प्रमुख प्रशांत मोरे यांनी केले. तर आभार महेश फुले यांनी मानले.