सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही
शहरातील वसमत रोडवरील तलाठी कार्यालयासमोर घडली घटना
परभणी (Shivshahi Bus fire) : परभणी ते हिंगोली धावणार्या शिवशाही बस क्र. एम.एच. ०९ – ई.एम. २२६३ या गाडीच्या टायरला अचानक आग लागल्याने प्रवाशांमध्ये मोठी खळबळ उडाली. वसमत रोडवरील तलाठी कार्यालयासमोर गाडीच्या टायरचा लायनर गरम होऊन आगीने पेट घेतल्याची घटना घडली.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल तत्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि आगीवर नियंत्रण मिळवले. या प्रसंगात सुदैवाने कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाली नाही. चालक दिपक कानोडे, वाहक वसीम अखील अहमद, आणि अग्निशमन दलाचे रोहित गायकवाड व उमेश कदम यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला. शिवशाही सारख्या लक्झरी गाड्या सुरक्षित प्रवासाची हमी देतात, परंतु प्रत्यक्षात गाड्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे.
महामंडळाच्या इतर गाड्यांची तर दयनीय अवस्था झाली आहे. (Shivshahi Bus fire) गाडी रस्त्यात बंद पडणे, पत्रे फाटलेली असणे किंवा तांत्रिक बिघाड होणे अशा बाबी वारंवार प्रवाशांना अनुभवला येत आहेत. ‘एसटी प्रवास म्हणजे सुरक्षित प्रवास’ हे वाक्य आजकाल फक्त घोषवाक्यापुरतेच मर्यादित झाले आहे. प्रवाशांच्या जीवाशी होत असलेला खेळ आणि व्यवस्थापनाची हलगर्जीपणा थांबवण्यासाठी एसटी महामंडळाने गाड्यांची वेळोवेळी तपासणी करणे, नियमित देखभाल करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
गाडी रस्त्यात पडली बंद
परभणी -जिंतूर मार्गावरील एम.एच. १४ – बी.टी. ३८९६ ही एसटी बस दुपारी १ च्या सुमारास जिंतूर रोडवर अचानक बंद पडली. यामुळे प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. महामंडळाच्या (Shivshahi Bus fire) गाड्यांचे वाढते बिघाड ही प्रवाशांसाठी चिंतेची बाब ठरत आहेत. यामुळे एसटी महामंडळाच्या व्यवस्थापनावर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.