राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाचा दणका
पायाभूत सुविधा, शिक्षक कमतरतेवर ठेवले बोट
पायाभूत सुविधा, शिक्षक कमतरतेवर ठेवले बोट
गडचिरोली (Medical College) : गेल्यावर्षीच्या शैक्षणिक सत्रापासून सुरू झालेल्या गडचिरोली येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. यामुळे (Medical College) शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनात खळबळ निर्माण झाली आहे. आतापर्यंत विविध मानके पार केल्यानंतर गडचिरोली येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गेल्या शैक्षणिक सत्रात १०० विद्यार्थ्यांचे प्रवेश होऊन प्रथम बॅच सुरू झाली आहे.
पायाभूत सुविधांकडे दीर्घकालीन अक्षम्य दुर्लक्ष आणि गंभीर धोका दुर्लक्षून नवीन (Medical College) शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारणीचा ध्यास याचा फटका राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना बसला आहे. आवश्यक शिक्षकवर्ग आणि पायाभूत सुविधांची मोठी कमतरता जाणवल्याने राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने गडचिरोलीसह राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना ‘कारणे दाखवा’ नोटीसा बजावल्या आहेत. आयुर्विज्ञान आयोगाने काही दिवसापुर्वी गडचिरोलीसह राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांची पाहणी केली होती. या संदर्भात अहवाल वरीष्ठ पातळीवर सादर करण्यात आला.
अहवालामध्ये गव्हर्न्मेंट मेडिकल कॉलेजमधील पायाभूत सुविधांमध्ये मोठी कमतरता दिसून आली होती. शिवाय, निकषांच्या तुलनेत ५० टक्क्यांपेक्षा कमी शिक्षकवर्ग उपलब्ध असल्याचा धक्कादायक निष्कर्ष पुढे आला होता. यामुळे आता राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना ‘कारणे दाखवा’ नोटीसा पाठवून राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाला मोठा दणका दिला आहे.
राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाचा गलथान कारभार कारणीभूत मानला जातो. (Medical College) वैद्यकीय महाविद्यालयांच्या मंजुरीसाठी राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाचे निकष पूर्ण केल्याचे कागदोपत्री चित्र दाखविण्यासाठी प्रस्थापित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून शिक्षकवर्ग स्थलांतरित करण्याचे धोरण अवलंबविण्यात आली होती. याची गांभीर्याने दखल घेऊन राज्य शासनाने पावले उचलली नाहीत, तर वैद्यकीय शिक्षण अडचणीत येऊ शकते. गोरगरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या वैद्यकीय शिक्षणाच्या स्वप्नांवर पाणी फिरण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
नोटीसीचे उत्तर पाठविले – डीन टेकाडे
या संदर्भात गडचिरोली येथील (Medical College) शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन टेकाडे यांना विचारणा केली असता त्यांनी राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाकडून कारणे दाखवा नोटीस आल्याच्या बाबीस दुजोरा दिला. आयोगाने वैद्यकीय महाविद्यालयातील मुलभूत सुविधांच्या कमरतेवर बोट ठेवले आहे. या संदर्भात विविध सुविधा उपलब्ध करण्याचे काम प्रशासकीय पातळीवर सुरू असल्याची माहिती आयोग तसेच शासनास पाठविण्यात आल्याचेही डीन टेकाडे यांनी दै. दैशोन्नतीशी बोलतांना दिली.