श्री च्या स्वागताला वरूण राजाची हजेरी
रिसोड (Shri Gajanan Maharaj) : शेगाव येथून श्री संत गजानन महाराज यांची पालखी पंढरपूरसाठी निघाली आहे. श्रीच्या पालखीचे 11 जून रोजी दुपारी तीन वाजता रिसोड शहरात आगमन झाले. आगमन होताच मालेगाव नाका येथे जोरदार स्वागत करण्यात आले. ढोल ताशे व बँडच्या पथकांनी वाजत गाजत पालखी शहरात आणण्यात आली.
श्रीच्या पालखीचे (Shri Gajanan Maharaj) शहरात अजून होतात वरून राजाने सुद्धा आपली हजेरी लावून स्वागत केले. संपूर्ण शहरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. दरवर्षी श्री संत शेगाव येथून गजानन महाराजांची पालखी आषाढी निमित्त पंढरपूरला मार्गस्थ होत असते. याही वर्षी श्री संत गजानन महाराज पालखीचे 11 जून रोजी रिसोड शहरात दुपारी तीनच्या दरम्यान आगमन झाले.
पालखी मालेगाव नाका येथे दाखल होतात शहरवासी याच्या वतीने जोरदार स्वागत करण्यात आले. त्यानंतर ढोल ताशे व बँड पथकाने वाजत गाजत पालखी शहरात दाखल झाली. शहरात ठीक ठिकाणी व्यापारी व इतर संघटनांच्या वतीने पालखीचे स्वागत करून वारकऱ्यांना भेटवस्तू व जीवनावश्यक वस्तूचे वाटप करण्यात आले. संपूर्ण शहरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. ग्रामीण भागातूनही मोठ्या प्रमाणात भाविक भक्त शहरात दाखल झाल्यामुळे शहराला यात्रेचे स्वरूप आले होते.
लोणी फाटा येथून शहरातील मुख्य रस्त्याने नगर प्रदक्षिणा करून येथील बाजार समितीमध्ये विसावा घेणार आहे. बाजार समितीच्या वतीने वारकऱ्यांची भोजनाची व राहण्याची व्यवस्था करण्यात आली असून, वीस ते पंचवीस हजार भाविक भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. सकाळी पाच वाजता श्री ची पालखी (Shri Gajanan Maharaj) पंढरपूरच्या दिशेने मराठवाड्यात मार्गस्थ होणार आहे.