चौफेर कामाची पक्ष श्रेष्ठीनी घेतली दखल!
बुलढाणा (Shrikrishna Sapkal) : पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे श्रीकृष्ण सपकाळ (Shrikrishna Sapkal) यांची भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा सचिव ( चिटणीस ) पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार विजयराज शिंदे यांनी ही निवड केली. जिल्हाध्यक्ष शिंदे यांनी नुकतेच पक्षाची जिल्हा कार्यकारिणी जाहीर केली आहे. या सर्वसमावेशक कार्यकारिणीत महत्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या जिल्हा सचिव पदाची जवाबदारी युवा नेते श्रीकृष्ण सपकाळ (Shrikrishna Sapkal) यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
सपकाळ यांनी पत्रकारिता क्षेत्रात आणि बुलडाणा लाईव्ह च्या माध्यमाने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. मागील…. वर्षांपासून या क्षेत्रात कार्यरत असताना त्यांनी सामाजिक क्षेत्रातही उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. पूरग्रस्ताना मदत, रक्तदान, आरोग्य शिबीर, रोजगार मार्गदर्शन आदिसाठी पुढाकार घेतला. एक उत्कृष्ट व्याख्याते, वक्तृत्वाचे धनी ही देखील त्यांची एक स्वतंत्र ओळख राहिली आहे.
बालपणापासून हिंदुत्ववादी विचारसरणी कडे असलेला त्यांचा कल वयानुसार वाढतंच गेला. वक्तृत्व, नेतृत्व आणि कर्तृत्व याचा मिलाफ असलेल्या सपकाळ (Shrikrishna Sapkal) यांच्या या कामगिरीची दखलं घेत भाजपाने त्यांची जिल्हा सचिव पदी निवड केली आहे.