आष्टी (Wardha) :- शासनाने सुगंधित तंबाखुच्या (tobacco) विक्रीवर प्रतिबंध लावले असले तरी जिल्ह्यात सुगंधित तंबाखुची तस्करी वाढली असल्याचे गेल्या काही दिवसातील घटनावरून निदर्शनास येत आहे. दरम्यान आष्टी पोलिसांनी सुगंधित तंबाखुची तस्करी करणार्या आरोपींच्या मुसक्या आवळून तस्कराकडून ७ लाखांचा मुद्देमाल जप्त केल्याची कारवाई काल १८ जून रोजी संध्याकाळी ६ वाजताच्या सुमारास आष्टी नजीक केली. मयूर पंढरी पोहनकर(२९) वार्ड क्रमांक ०२ न्यू कॉलनी, करंजी, तालुका गोंडपिपरी, जिल्हा चंद्रपूर असे अटक केलेल्या आरोपीचे नांव आहे.
चारचाकी वाहनातून प्रतिबंधीत सुगंधित तंबाखुची तस्करी केली जाणार असल्याची माहिती
प्राप्त माहितीनुसार चारचाकी वाहनातून प्रतिबंधीत सुगंधित तंबाखुची तस्करी केली जाणार असल्याची माहिती आष्टी पोलिसांना मिळाली. त्यानुसार आष्टी पोलिसांनी आष्टी येथील वनविभागाच्या नाक्यानजीक सापळा रचला. श्प् ०५ ँए २२०६ या क्रमांकाचे वाहन गोंडपिपरी मार्गे आष्टीकडे येतांना दिसले. पोलिसांनी वाहनास थांबवून झडती घेतली. वाहनचालकाने आपले नांव मयुर पोहनकर असल्याचे सांगितले. पोलिसांनी वाहनाची पंचासमक्ष झडती घेतली असता वाहनामध्ये ६० हजार रूपये किमतीचे प्रतिबंधीत ईगल कंपनीचे कागदी पुडे, ७ लाख रूपये किमतीचे वाहन असा एकंदरीत ७,७७,३२५ रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी आरोपीविरोधात आष्टी पोलीस ठाण्यात अप. क्र. :- १४१/२०२५ कलम १२३, २७४, २७६, २७७ बि. एन. एस. नुसार गुन्हा (Crime) दाखल करून त्याला अटक करण्यात आली. पुढील तपास पोलीस निरीक्षक विशाल काळे यांच्या मार्गदर्शनात पोउपनि सोमनाथ पवार करीत आहेत.




