कान्हेगाव शिवारातील घटना!
परभणी (Soybean Husk Fire) : परभणीतील पूर्णा तालुक्यातील कान्हेगाव येथील अल्पभूधारक शेतकरी प्रल्हाद जनार्दन बोकारे यांनी ओल्या दुष्काळातून मोठया कष्टाने सांभाळून ठेवलेली सोयाबीनच्या गंजीला कुणीतरी खोडसाळपणे जळती काडी फेकली. ही घटना बुधवार १५ ऑक्टोबर रोजी घडली. यात आगीच्या भक्ष्यस्थानी पडून सोयाबीनची अक्षरश राख झाली.
शेतकर्याचे दहा क्विंटल सोयाबीन जळून खाक!
आधीच बाजारपेठेत नवीन सोयाबीनची ओल्या दुष्काळामुळे आवक कमी आहे. त्यातच व्यापारी भाव पाडून मागत आहेत. अशातच आगीतून फुफाट्यात म्हणावे की काय? त्याप्रमाणे होत्या चे नव्हत्ये झाले असून सोयाबीनला आग लागल्याने सदर शेतकरी अक्षरश: धाय मोकलून रडत आहे. प्रशासनाने (Administration) सदर बाबींकडे गांभीर्याने लक्ष देऊन दुष्काळग्रस्त, संकटग्रस्त शेतकर्यांना (Farmers) मदतीचा हात द्यावा अशी मागणी परिसरातून होत आहे.




 
			 
		

