ऊसाऐवजी साखरेलाच भाव मागू लागले!
लातूर (Soybean Price) : एकेकाळी दहा हजार रुपये प्रतिक्विंटल वर पोहोचलेल्या सोयाबीनचे भाव हमी पेक्षाही पार कमी झाल्यामुळे सोयाबीन उत्पादक मेटाकुटीला आला असताना आणि दुसरीकडे उसालाही 3000 पुढे भाव जात नसल्याने लातूरमध्ये क्रांतिकारी शेतकरी संघटनेने (Revolutionary Farmers Association) उद्या गुरुवारी सोयाबीन परिषदेचे आयोजन केले आहे. मात्र या या परिषदेत सोयाबीनला 9 हजार रुपये प्रतिक्विंटल ची मागणी करतानाच उसाला मात्र प्रति टनाची मागणी या संघटनेने केली नाही. विशेष म्हणजे ऊसाऐवजी संघटनेचे नेते साखरेलाच भाव मागू लागले आहेत.
लातूर आतील आजच्या सोयाबीन-ऊस परिषदेकडे शेतकऱ्यांचे लक्ष!
रविकांत तुपकरांच्या उपस्थितीत गुरुवारी (दि.16) लातूर येथे मार्केट यार्ड आतील दगडोजीराव देशमुख सभागृहात दुपारी एक वाजता ऊस सोयाबीन परिषद होणार आहे. एकीकडे मूळ स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते असलेले राजू शेट्टी कोल्हापूर जिल्ह्यात जयसिंगपूरला परिषद घेत असताना दुसरीकडे क्रांतिकारी शेतकरी संघटनेने लातूरमध्ये ही ऊस सोयाबीन परिषद आयोजित केली आहे. शेतकरी संघटनांच्या (Farmers Association) होणाऱ्या या परिषदांमधून शेतीमालाला किती भाव मिळावा, याचे गणित मांडले जाते. अलीकडच्या काळात शेती व्यवसाय आतभट्ट्याचा झाला आहे. उत्पादन खर्चात मोठी वाढ झाल्याने आणि उत्पादित शेतमालाला हमी पेक्षा कमी भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांचा जमाखर्चाचा मेळ कायमचा हुकत आहे. शेती तोट्यात गेल्याने अत्यंत टोकाचे पाऊल म्हणजे आत्महत्या सारखे पाऊल अनेक शेतकरी उचलत आहेत. सरकारने शेतमालाला हमीभाव जाहीर केले आहेत. दरवर्षी जाहीर केले जातात. मात्र त्याची अंमलबजावणी केली जात नाही. अंमलबजावणी करणाऱ्या कोणत्याही यंत्रणेला सरकार जबाबदार धरत नाही किंवा त्या यंत्रणांवर कारवाई करत नाही. केवळ कानाडोळा करण्याची भूमिका केंद्र व राज्य सरकारने (State Govt) या प्रकरणात घेतल्याने शेतकऱ्यांपुढे मोठे संकट उभे टाकले आहे.
सोयाबीन उत्पादकांचे भले का होणार नाही? असा सवाल
अशा परिस्थितीत उत्पादन खर्चाच्या दीडपट भाव उत्पादित शेतमालाला मिळावा, या प्रमुख मागणीसाठी क्रांतिकारी ची ही ऊस सोयाबीन परिषद होत आहे. या परिषदेत या संघटनेने सोयाबीनला उत्पादन खर्च सहा हजार रुपये गृहीत धरून त्याच्या दीडपट म्हणजे 9 हजार रुपये प्रति क्विंटल असा भाव मागितला आहे. या परिषदेत ऊस पिकाबाबत चर्चा होणार आहे. मात्र उसाला भाव मागण्या ऐवजी क्रांतिकारी शेतकरी संघटना साखरेला ‘बेसरेट’प्रतिक्विंटल 4 हजार रुपये मागत आहे. म्हणजे क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते साखर कारखानदारांचे हित अगोदर पाहून नंतर शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करतात का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत. जर साखरेलाच बेसरेट मागितल्याने ऊस उत्पादकांचे भले होत असेल तर तेलाला बेसरेट मागून सोयाबीन उत्पादकांचे भले का होणार नाही? असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.
शेतकऱ्याची कुचेष्टा!
सोयाबीनला 2021 मध्ये जवळपास दहा हजार रुपये प्रति क्विंटल भाव होता. नंतर तो भाव कमी झाला. कमोडिटी मार्केटमधून सोयाबीन अलगद बाजूला निघाल्याने ही परिस्थिती ओढवली. आज पर्यंत सोयाबीन आता 4000 मध्ये प्रतिक्विंटल जात आहे. दुसरीकडे 2019 मध्ये साखरेला 3100 प्रतिक्विंटल ‘बेसरेट’ होता. 2025 मध्ये ही साखरेचा बेस रेट तोच आहे. एकीकडे देशांतर्गत सर्व उत्पादनांचे भाव, मालांचे भाव किंवा वस्तूंचे भाव वाढत असताना शेतमालाचे भाव का वाढत नाहीत? हा सवाल शेतकऱ्यांनी सरकारला कधीतरी विचारायलाच हवा.