मानोरा (Washim) :- तालुक्यातील भोयनी येथील सोयाबीन नाफेड (Soybean Nafed) खरेदी केंद्राला दि. ८ जानेवारी रोजी आमदार सईताई डहाके यांनी भेट देऊन नाफेड खरेदी केंद्राची पाहणी करून माहिती घेत वरीष्ठ अधिकारी यांच्याशी वार्तालाप करून बारदाना उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले.
भोयणी येथील नाफेड केंद्रावरील प्रकार
यावेळी आ. सईताई डहाके यांना रुद्रविर अग्रो प्रोडूसर(Agro Producer) कंपनीचे डायरेक्टर यांनी माहिती दिली की, भोयणी येथील नाफेड खरेदी केंद्रावर ३२०८ सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी माल विक्रीसाठी नोंदणी केली असुन आतापर्यंत १३७८ शेतकऱ्यांचा माल मोजणी झालेली आहे. अजुनही १८३० नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांचे माल मोजणी बाकी आहे. शेतकरी वाहनाने आपला माल घेऊन नाफेड केंद्रावर येत आहेत, मात्र बारदाना अभावी सोयाबीन मोजणी खोळंबली असुन बारदाना उपलब्ध करून देण्याची विनंती आमदार महोदय याजकडे करण्यात आली. यावेळी त्यांनी वरीष्ठ स्तरावर अधिकारी यांच्याशी चर्चा करून बारदाना उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.
यावेळी डायरेक्टर प्रमिला देवराव उपाध्ये, श्वेता उपाध्ये, प्रमोद गुंजाटे, अर्चना गुंजाटे, मंदाबाई काळे, भाऊराव चौधरी, विश्र्वदत्त श्यामसुंदर, शारदा बाकल, सरपंच बाळू राठोड, माणिक पवार, हिम्मत राऊत, मयूर राऊत, राम पाटील, रवि दिघडे, बंडू राठोड, वामन गावंडे, सुरेश म्हस्के, विजय इंगोले, गोवर्धन चव्हाण, महादेव राठोड , विनोद सावळे , गजनान पुंड, रोशन तिडके, दादा पाटील आदीसह शेकडो शेतकऱ्यांची उपस्थिती होती.




