बायपास महामार्गावरील कोरंभी जवळील घटना
खमारी/बुटी (Truck-Bike Accident) : नवीन बायपास महामार्गावर कोरंभीजवळ दि.३० जून रोजी रात्री ९.४५ वाजतादरम्यान (Truck-Bike Accident) भीषण अपघात घडला. भरधाव दुचाकी उभ्या ट्रकवर आदळली. त्यात दोघा दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू झाला. सोनू केरु पालवे (२३) रा.गिरोला व मृणाल अशोक मानवटकर (२५) रा.जाखेगाव ता. मौदा, असे मृतकांची नावे आहेत.
घटनेच्यावेळी (Truck-Bike Accident) नवीन बायपास महामार्गावर कोरंंभी गावाजवळ ट्रक क्र.एमएच ३६ एबी ७२९९ हा उभा होता. परिसरात काम केले जात होते. त्यामुळे महामार्गाच्या काही लेनवर बेरिकेट्स आढवे लावण्यात आले होते. रात्री ९.४५ वाजतादरम्यान मृतक हे दुचाकी क्र.एमएच ३६ एडी ९२२७ या गाडीने भरधाव जात असतांना बॅरिकेट्स पाळून उभ्या ट्रकला मागेहून जबर धडक दिली. दुचाकी अक्षरश: ट्रकच्या चाकातच शिरली. दुचाकीवरील दोघेही जण या अपघातात जागीच मृत पावले.
अपघाताची माहिती कामावरील सुपरव्हायझर संदीप घाटबांधे यांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी माहिती मिळताच घटनास्थळ गाठून घटनेचा पंचनामा केला व दोघांचेही प्रेत शवविच्छेदनाकरीता जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले. (Truck-Bike Accident) मृत हे दोघेही मित्र असल्याचे सांगितले जाते. ट्रकचालकाच्या तक्रारीवरुन भंडारा पोलिसात घटनेची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास ठाणेदार उल्हास भुसारी, पोउपनि जुनूनकर यांनी पोलीस ताफ्यासह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.