प्रलंबीत मागण्यांकडे वेधले लक्ष; विविध संघटनांचा सहभाग!
परभणी (Electricity Workers Strike) : देश व राज्यात वीज उद्योगात सुरू असलेल्या खाजगीकरणाच्या विरोधात तसेच राज्यातील वीज कर्मचारी, अभियंते, अधिकारी यांच्या पगार वाढीच्या करारा नंतर प्रलंबीत असलेल्या मागण्यां संदर्भात महाराष्ट्र राज्य वीज कामगार, अभियंते, अधिकारी संयुक्त कृती समितीच्या वतीने बुधवार 9 जुलै रोजी संप पुकारण्यात आला. परभणीत महावितरण कार्यालयासमोर कर्मचार्यांनी जोरदार आंदोलन केले.
राज्यभरातील कर्मचार्यांनी संपात सहभाग नोंदविला!
संपाच्या पार्श्व भुमीवर झालेल्या बैठकीत कोणतेही ठोस आश्वासन मिळाले नाही. त्यानंतर विविध संघटनांनी (Organizations) संपावर जाण्याचा निर्णय घेतला. राज्यभरातील कर्मचार्यांनी संपात सहभाग नोंदविला. खाजगीकरण (Privatization) व इतर प्रलंबीत मागण्यांकडे (Pending Demands) लक्ष वेधण्यासाठी सदर संप (Strike) पुकारण्यात आला होता. परभणी येथील आंदोलनात (Aandolan) कामगार संघटना संयुक्त कृती समिती, महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी, अभियांत्रिकी व अधिकारी कृती समितीचे पदाधिकारी अभियंता पवन सामाले, अभियंता गुडे, राम गिरीवार, कवळे, पंकज पतंगे, अरुण माने, शेख जमीर, किशन दुधारे, शेख खादर यांच्यासह इतरांची उपस्थिती होती.