गुरुवारी सकाळी उघडकीस आली घटना मोबाईल, इलेक्ट्रॉनिक वस्तू लंपास
परभणी (Parbhani mobile shop Theft) : शहरातील वसमत रोडवर असलेले एस.एस. मोबाईल शॉप हे मोबाईल शोरुम चोरट्यांनी फोडल्याचे गुरुवार २२ मे रोजी सकाळी उघडकीस आले. शोरुममधून मोबाईल व इतर इलेक्ट्रॉनिक साहित्य मिळून जवळपास ८० लाख रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केल्याचा अंदाज आहे. नेमका किती माल चोरीला (Parbhani mobile shop) Theft गेला आहे हे हिशोबानंतरच लक्षात येईल.
वसमत रोडवर झरकर यांचे एस.एस. मोबाईल शॉप आहे. बुधवार २१ मे रोजी रात्री साडे नऊ ते दहाच्या दरम्यान नेहमी प्रमाणे दुकान बंद करण्यात आले. गुरुवारी पहाटेच्या सुमारास दुकान शेजार्यांना शोरुमचे शटर उचकटलेले दिसले. त्यांनी याची माहिती झरकर यांना दिली. घटनास्थळी येऊन पाहणी केल्यावर चोरी झाल्याचे लक्षात आले. (Parbhani mobile shop) Theft घटनेची माहिती नवा मोंढा पोलिसांना देण्यात आली.
स्थागुशाचे पोनि. विवेकानंद पाटील यांच्यासह पथक घटनास्थळी दाखल झाले. श्वान पथक, ठसे पथकालाही पाचारण करण्यात आले. प्राथमिक अंदाजानुसार मोबाईल, टिव्ही, साउंड सिस्टम, स्पीकर आदी साहित्य मिळून जवळपास ८० लाख रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याचे दिसत आहे. चोरटे सीसीटिव्ही कॅमेर्यामध्ये वैâद झाले आहेत. या (Parbhani mobile shop Theft) प्रकरणी नवा मोंढा पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
