बोगद्यामधील कारवर बस आदळली
जवाहरनगर (ST Bus Accident) : ‘वेळ आली होती पण काळ आला नव्हता’, या म्हणीचा प्रत्यय भंडारा तालुक्यातील महामार्गावरील ठाणा/पेट्रोलपंप येथे दि.२० एप्रिल रोजी रात्री ७.४५ वाजतादरम्यान घडलेला धक्कादायक प्रकार उघडकीस आला. एसटी बसचालकाला उष्णतेमुळे भोवड आल्याने बस अनियंत्रित होऊन बोगद्यात शिरुन पार्विंâग असलेल्या कारवर आदळली. यामध्ये (ST Bus Accident) बसमधील प्रवासी थोडक्यात बचावले असून मोठा अनर्थ टळला. नेहमी घटनास्थळी नागरिकांनी गजबजलेल्या चौकातील नागरिक सैरावैरा पळाल्याने मोठा अनर्थ टळल्याचे प्रत्यक्षदर्शीकडून सांगितले जात आहे.
ठाणा/पेट्रोलपंप येथील धक्कादायक प्रकार
तुमसर आगाराची एसटी बस क्र.एमएच ४० वाय ५८१८ ही राजूरा-नागपूरमार्गे तुमसर येथे जाण्यास निघाली. चालक राजू रामदास ठाकरे रा.तुमसर, यांनी प्रवाशी घेऊन तुमसरकडे जात असतांना ठाणा पेट्रोलपंप बसस्थानकावर प्रवाश्यांना उतरवून पुढे जाण्यास निघाली. (ST Bus Accident) बसस्थानकावरुन गाडी सुटताच चालकाला उष्णतेमुळे भोवळ आली. परिणामी एसटी बस अनियंत्रित होऊन बोगद्यात शिरली. सुदैवाने एसटीचा वेग कमी असल्याने मोठी दुर्घटना टळली.
‘वेळ आली होती पण काळ आला नव्हता’, या म्हणीचा प्रत्यय
एसटी बस अनियंत्रित होऊन थेट बोगद्यात शिरली. त्यावेळी बोगद्यात पार्विंâग करुन ठेवलेल्या कार क्र.एमएच ४० सीएस ३०२३ या कारवर आदळली. सुदैवाने त्यावेळी कारमध्ये कोणीच नव्हते. घटना घडताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. (ST Bus Accident) एसटी चालकाला स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले. राज्य परिवहन महामंडाळाच्या अधिकार्यांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती जाणून घेतली. प्रवाश्यांना दुसर्या एसटी बसने पाठविण्यात आले. या घटनेत दोन्ही वाहनांचे नुकसान झाले.
बोगदा नागरिकांनी गजबजलेलाच
ठाणा/पेट्रोलपंप महामार्गावर उड्डाणपूल असून जवाहरनगरकडे जाण्यासाठी मोठा बोगदा आहे. या बोगद्याखाली नेहमीच नागरिकांची वर्दळ राहत असून गजबजलेला असतो. या बोगद्याखाली अनेक व्यवसायिकांनी आपली व्यवसाय प्रतिष्ठाने तयार केली असून अनेक नागरिक वाहन पार्विंâगकरीता बोगद्याचा वापर करीत आहेत. त्यावेळी बसस्थानकावरुन (ST Bus Accident) बस सुटली. तेव्हा सुदैवाने एसटी बसचा वेग अत्यल्प असल्याने मोठा अनर्थ टळला. अन्यथा कित्येक नागरिक एसटी बसखाली चिरडण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. या वेळी ५२ प्रवासी प्रवास करीत असल्याचे सांगितले जात आहे.