दुचाकीस्वार दोघांचा जागीच मृत्यू!
परभणी (ST Bus Accident) : परभणीतील पाथरी शहराजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 548 वर मंगळवार 22 जुलै रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास एक भीषण अपघात घडला. दुचाकीवरून प्रवास करणारे दोघेजण समोरून येणाऱ्या एस.टी. बसच्या खाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात इतका भयावह होता की दुचाकी थेट बसखाली अडकली, तर मृतदेह रस्त्याच्या कडेला फेकले गेले.
दुचाकी थेट बस खाली आल्याने अपघात!
अपघाता विषयी मिळलेल्या माहितीनुसार पाथरी आगारातील एस.टी. बस क्र. MH 22 AK 1583 ही सोनपेठकडे निघाली होती. यावेळी पाऊस चालू होता .दरम्यान, विरुद्ध दिशेने भरधाव वेगाने येणारी दुचाकी क्र. MH 22 AK 1583 थेट बससमोर आली आणि दोन्ही वाहनांची जोरदार धडक झाली. धडकेनंतर दुचाकी बसखाली अडकली .अपघातानंतर बस रस्ता सोडून खाली उतरली होती . अपघातात दुचाकीवरील
लतिफ अहमद पठाण (वय 56), रा. इंदिरानगर, पाथरी शेख अनवर शेख नूर (वय 39), रा. इंदिरानगर, पाथरी हे दोघे व्यक्ती जागीच ठार झाले.
बसमधील कोणत्याही प्रवाशाला इजा झाली नाही!
घटनेनंतर बस रस्ता सोडून थांबली. सुदैवाने, बसचालकाने वेळेवर प्रसंगावधान दाखवल्यामुळे बसमधील कोणत्याही प्रवाशाला इजा झाली नाही. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक (Inspector of Police) महेश लांडगे, पोना सुरेश कदम यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. दरम्यान, अपघातातील मृतदेह ग्रामीण रुग्णालयामध्ये (Rural Hospital) आणण्यात आले आहेत .